ETV Bharat / entertainment

Dream Girl 2 Trailer : विनोदांची आतिषबाजी आणि हास्याचे कारंजे उडवणारा 'ड्रीम गर्ल २' चा ट्रेलर रिलीज - आयुष्मान खुराना

आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल २'चा धमाल ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडेसह परेश रावल आणि अन्नु कपूरची धमाल केमेस्ट्री यात पाहायला मिळत आहे. 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरतेने पाहत असून हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

DREAM GIRL 2
Etv Bharat
author img

By

Published : Aug 1, 2023, 9:10 PM IST

मुंबई : आयुष्मान खुरानाची गणना बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांमध्ये केली जाते. आयुष्मानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. गेली काही महिने त्याच्या ड्रीम गर्ल २ चित्रपटाची प्रतीक्षा चाहते करत आहेत. या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित धमाल ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. भरपूर प्रहसने, धमाल प्रसंग आणि हास्याचा खळाळता धबधबा असणारा हा ट्रेलर ड्रीम गर्ल २ बद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. 'ड्रीम गर्ल २'मध्ये आयुष्मान हा त्याच्या जुन्या अंदाजात पूजा या व्यक्तीरेखेत दिसणार आहे. २०१९मध्ये आलेला 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता. यामध्ये आयुष्मानने पूजाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ड्रीम गर्ल २चा ट्रेलर : ड्रीम गर्ल २ चा ट्रेलर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा असणार याची प्रचिती ट्रेलर पाहून आल्या शिवाय राहात नाही. अनेक धमाल प्रसंगाची रेलचेल ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या भागा इतकाच धमाल चित्रपट असणार याची खात्री हा ट्रेलर पटवून देण्यात यशस्वी झाला आहे.

पूजा या पात्राचे धमाल प्रमोशन - पुन्हा एकदा ड्रीम गर्ल पूजा प्रेक्षकांचे मने जिंकण्यासाठी येत आहे. ड्रीम गर्ल पूजाच्या चाहत्यांच्या यादीत बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स सामील झाले आहेत. यामध्ये भाईजान सलमान खानपासून पठाण शाहरुख खानपर्यंत अनेक सुपरस्टार्सच्या नावे समोर येत आहेत. याशिवाय या यादीत एंट्री रॉकी म्हणजेच रणवीर सिंग झाली आहे. ड्रीम गर्ल पूजाची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने आहेत. आयुष्मान खुरानाने आता चाहत्यांची आतुरता वाढवली आहे.

चित्रपटगृहांमध्ये ड्रीम गर्ल २ लवकरच दिसणार : आयुष्मान खुरानाने 'ड्रीम गर्ल २' च्या पोस्टरसह त्याचा लूक उघड केला आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये तो लाल रंगाचा लेहेंगा-चोली परिधान करून कारच्या बोनेटवर उभा असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या मागे अनेक मुलांची लाईन आहे, जे तिचे चाहते आहेत. 'ड्रीम गर्ल २' च्या नवीनतम पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना सोबत परेश रावल आणि अनु कपूर सारखे अनुभवी कलाकार आहेत. या पोस्टरमध्ये राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, मनजोत सिंग आणि मनोज जोशी यांचाही समावेश आहे. बी-टाऊनच्या कॉमेडी पॉवरहाऊसने भरलेले हे नवीन पोस्टर शेअर करताना आयुष्मान खुरानाने लिहिले आहे, 'ट्राफिक जाम होणार आहे, कारण पूजा येणार आहे. याशिवाय हा चित्रपट २५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. RARKPK Box Office Collection Day 4 : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने चौथ्या दिवशी ५० कोटींचा टप्पा केला पार...
  2. Guns and Gulab : 'गन्स अँड गुलाब' मालिकेचे अभिनेता दुल्कर सलमानचे मोशन पोस्टर लॉन्च
  3. National girlfriends day 2023 : 'तमाशा' ते 'कुछ कुछ होता है' पर्यंत, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत पाहा हे खास हिंदी चित्रपट...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.