ETV Bharat / entertainment

Dream girl 2 trailer date out : 'चंकी' बनला पूजाचा 'फंकी' फॅन, 'ड्रीम गर्ल २'च्या ट्रेलर डेटची घोषणा - अनन्या पांडे

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल २' चित्रपटच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी ट्रेलरच्या तारखेसह मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Dream girl 2
ड्रीम गर्ल २
author img

By

Published : Jul 29, 2023, 4:52 PM IST

मुंबई : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाच्या रिलीजची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. नुकताच या चित्रपटातून आयुष्मानच्या 'पूजा' भूमिकेचा फर्स्ट लूक समोर आला होता. आयुष्मानच्या फर्स्ट लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. तसेच चाहत्यांमध्ये आता या चित्रपटाबाबत खूप जास्त उत्सुकता वाढली आहे. दरम्यान आता चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट समोर आली आहे. आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या 'ड्रीम गर्ल २'ची ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर झाली असून या चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट जाहिर करताना एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनन्या पांडेचे वडील चंकी पांडे 'ड्रीम गर्ल २' 'पूजा'च्या प्रेमात वेडे झालेले दिसत आहेत.

चंकी पांडे पूजाच्या प्रेमात झाले वेडे : या व्हिडिओमध्ये चंकी पांडे पूजाशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांची मुलगी अनन्या त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की, 'ड्रीम गर्ल २' माझा चित्रपट आहे त्या पूजाचा नाही. त्यानंतर अनन्या म्हणते तिच्या वडीलांना की तुम्ही बालाजीला फोन लावा त्यानंतर ती तिथून निघून जाते. चंकी बालाजी प्रोडक्शनला फोन लावण्याचे नाटक करत फोन उचला असे मोठ्याने म्हणतो. नंतर फोन लाईनवर पूजा येत तो पूजाशी (आयुष्मान) खूप प्रेमाने बोलतो आणि तिच्या प्रेमात पडतो. पूजाशी गोडपणे वागत तो पत्नी आणि मुलीकडे दुर्लक्ष करतो. असे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे.

ट्रेलर कधी रिलीज होणार : या व्हिडीओसोबत असे सांगण्यात आले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर १ ऑगस्टला रिलीज होणार आहे, तर हा सिनेमा ११ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर रिलीज होईल. राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट प्रेक्षकांना आणखीनच हसवणार आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान आणि अनन्या व्यतिरिक्त परेश रावल, राजपाल यादव आणि अन्नू कपूर देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट २०१९मध्ये आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता 'ड्रीम गर्ल २' हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असे दिसत आहे.

हेही वाचा :

Kangana Ranaut criticizes : 'नेपो गँग कुठे दडलीय?', म्हणत कंगना रणौतची करण जोहरवर टीका

Taali Release Date OUT :श्रीगौरी सावंतच्या ट्रान्सजेंडर भूमिकेत सुश्मिता सेन, पाहा टीझर

Sanjay Dutt First Look: संजय दत्तचा 'डबल इस्मार्ट' लूक, साकारणार खतरनाक 'बिग बुल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.