ETV Bharat / entertainment

सनी चित्रपटाचा शो रद्द झाल्यामुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे नाराज

मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत.

Etv Bharat
सनी चित्रपटाचा शो रद्द झाल्यामुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे नाराज
author img

By

Published : Nov 21, 2022, 5:18 PM IST

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना सापत्न वागणूक मिळण्याचे प्रकार सुरूच आहेत. याबद्दल अनेकांनी कोरोनापूर्व काळात आवाज उठवला होता. परंतु आताही मराठी चित्रपटांची मुस्कटदाबी सुरूच आहे, खासकरून मल्टिप्लेक्सवाल्यांकडून. सनी साठी तिकीट बुकिंग घेऊन शो परस्पर रद्द केल्यामुळे उद्विंग्न झालेले सनी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक हेमंत ढोमे विचारताहेत "मराठी चित्रपट चालणार कसे?"

मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे अनेकांकडून कौतुक होत असतानाच कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग घेऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी संपर्क साधला. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत.

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंन ढोमे यांनी नाराजी व्यक्त केली. हेमंत ढोमे म्हणतात, ‘’थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’

हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा सुपरहिट ठरला होता आणि सनीचे शोज रद्द केल्यामुळे त्यांना मनस्ताप नक्कीच होत असणार.

हेही वाचा - माहेर सोडून सासरी जाणाऱ्या मुलीसाठीचे मनाला चटका लावणारे गाणे "बकुळा"!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.