मुंबई - Special screening of jawan : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट हा रूपेरी पडद्यावर सध्या धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक अॅटलीनं मुंबईत सैनिकांसाठी 'जवान'चं खास स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. ज्यामध्ये भारतीय लष्कराचे सैनिक, पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते. हा चित्रपट सेलिब्रिटींपासून तर सर्व सामान्य लोकांना खूप आवडत आहे. 'जवान' 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे.
अॅटलीनं आयोजित केलं स्पेशल स्क्रीनिंग : पोलीस अधिकारी, भारतीय लष्कर आणि वाहतूक पोलिसांनी 'जवान' पाहिल्यानंतर खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. याशिवाय चाहत्यांच्या देखील या चित्रपटाचा चांगला रिव्ह्यू दिला आहे. दरम्यान शाहरुखने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलं, 'जवानसाठी तुमचं प्रेम आणि कौतुक केल्याबद्दल धन्यवाद, सुरक्षित आणि आनंदी रहा... कृपया चित्रपटाचा आनंद घेत असलेल्या तुम्हा सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत रहा. आणि मी लवकरच सर्वांना भेटण्यासाठी परत येईन. तोपर्यंत 'जवान'सोबत थिएटरमध्ये पार्टी करा, खूप प्रेम आणि कृतज्ञता. असं शाहरुखनं चाहत्यासाठी एक पोस्ट केली आहे.
'जवान' बॉक्स ऑफिसवर करत आहे धमाल : किंग खानच्या 'जवान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी भारतात 80.5 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. हा चित्रपट हिंदी आवृत्तीमध्ये जबरदस्त कलेक्शन करत आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 287.06 कोटी झालं आहे. लवकरच हा चित्रपट 300 कोटीचा आकडा रूपेरी पडद्यावर पार करणार आहे. 'जवान' भारतातच नाही तर जगभरात जोरदार कमाई करून विजयाचे झेंडे रोवत आहे. या चित्रपटाकडून शाहरुख खान खूप अपेक्षा आहेत. 'जवान' चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, योगी बाबू, सुनील ग्रोव्हर, प्रियमणी, संजय दत्त, रिद्धी डोगरा आणि गिरिजा ओक हे कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे.
हेही वाचा :
- G20 Summit : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी जी20 परिषदेदरम्यान 'आरआरआर'चे केलं कौतुक...राजामौली यांनी मानले आभार
- Babil Khan : इरफान खानच्या मुलाने 'स्टार किड' असण्याचं नाकारलं ; म्हणाला वडिलांमुळं मिळतो विशेषाधिकार...
- Sunny Deol And Shah Rukh Khan : सनी देओल-शाहरुख खानमधील वाद १६ वर्षानंतर मिटला, नेमक काय घडलं?