ETV Bharat / entertainment

Anubhav Sinha birthday: अनुभवातून प्रेक्षकांची नस ओळखलेला दिग्दर्शक अनुभव सिन्हा - दिग्दर्शक अनुभव सिन्हा वाढदिवस

बॉलिवूडमध्ये वास्तवावादी चित्रणाचे नवे पर्व सुरू करणाऱ्या दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. व्यावसायिक चित्रपटापासून सुरुवात करत क्लासिकल चित्रपटाची निर्मिती करण्याची यशस्वी शैली त्याने स्वीकारली आणि यशस्वीही करुन दाखवली आहे.

Anubhav Sinha birthday
दिग्दर्शक अनुभव सिन्हा
author img

By

Published : Jun 22, 2023, 5:43 PM IST

मुंबई - अनुभव सिन्हा हा आजच्या घडीचा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची नस ओळखलेला यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात त्याने एकाहून एक सरस चित्रपट दिलेत. त्याने निर्माण केलेले आधीचे चित्रपट पाहिले तर हाच का तो दिग्दर्शक असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

अनुभव सिन्हाचा अलिकडेच भीड हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा एका नव्या क्लासिक सिनेमाची अनुभूती प्रेक्षकांनी घेतली. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जेव्हा आपल्या रुपेरी पडद्यावर दिसायला लागतात आणि त्यातून एका नव्या कथानकातून आपण गुंतून जातो, वास्तवाचे भान मिळते आणि एका समृद्ध अनुभवातून आपण जातो, ही किमया करणारा अनुभव सिन्हा असतो. त्याचे चित्रपट केवळ समीक्षकांनाच नाही तर सामान्य प्रेक्षकांलाही भुरळ घालतात. असा हा प्रतिभावान माणूस आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

अनुभव सिन्हा यांनी स्वत: दिग्दर्शक म्हणून केलेल्या परिवर्तनाची वारंवार कबुली दिली आहे. अनुभवने स्वतः सांगितले होते की, 2001 मध्ये तुम बिन हा चित्रपट बनवताना खूप गाणी असतील, असे सांगण्यात आले होते. या चित्रपटात तब्बल ११ गाणी होती. त्यामुळेच त्याने हा सिनेमा स्वीकारला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बरा चालला पण याला सर्वात जास्ट रेटिंग मिळाले टीव्ही प्रसारणातून. यातील गाणी हिट झाली आणि हा कोण दिग्दर्शक आहे म्हणून निर्मात्यांची त्याच्यावर नजर गेली. त्यानंतर त्याने आपको पहले भी कही देखा है, दस, तथास्तु, कॅश आणि रावण असे चित्रपट बनवले. तुम बिन ते रावण अशी त्याची पहिली यशस्वी इनिंग होती. परंतु हे सर्व चित्रपट व्यावसायिक दृष्टीकोनातून बनवलेले सिनेमा होते. शाहरुख खानसोबतचा रावण हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्यानंतर दिग्दर्शकाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले आणि तिथून बहुधा नवा अनुभव सिन्हा जन्माला आला असावा.

तुम बिन २ या चित्रपटाचा सिक्वेल त्याने २०२६ मध्ये बनवला. यातही भरपूर गाण्यांचा समावेश होता. ही म्यूझिकल लव्ह स्टोरी प्रेक्षकांना आवडली पण अनुभवच्या मनात अजून काही वेगळेच होते. मुळात हा बदल त्यांनी 'आर्टिकल 15' चित्रपटातून सुरू केला होता. एका मुलाखतीत या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला की, या चित्रपटाची पटकथा मी रागातूनच लिहायला सुरुवात केली. आणि तो राग त्याला त्याच्या चित्रपटात दाखवायचा होता, त्यामुळे त्याच्यात बदल झाला. 'आर्टिकल 15' चित्रपटात समाजाचे जाती वास्तव आणि शोषणाचे चित्रण करुन त्याने प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.

प्रत्येक दिग्दर्शकाची आपली एक विशिष्ठ शैली असते. त्याच चाकोरीतून त्याचे सिनेमे बनताना दिसतात. पण अनुभव सिन्हाबाबातचा आपला अनुभव पूर्ण वेगळा आहे. दुसऱ्या टप्प्यात त्याने स्वतःला पूर्ण बदलून टाकले आणि सकस कथानक असलेले वास्तववादी चित्रपटांच्या निर्मितीवर भर दिला. आर्टिकल 15, अनेक, मुल्क आणि थप्पड या चित्रपटांच्या समीक्षणाकडे पाहिले की अनुभव सिन्हा किती बददललाय याचा प्रत्यय येतो. त्याच्या विशाल प्रतिभेतून आणखी वास्तववादी चित्रपटाची निर्मिती त्याच्या हातून व्हावी ही याच त्याला वाढदिवसानिमित्य सदिच्छा.

हेही वाचा -

१. Zhzb Collection Day 20 : 'जरा हटके जरा बचके'ने पुन्हा बॉक्स ऑफिसवर घेतली झेप, जाणून घ्या 20व्या दिवसाचे कलेक्शन

२. Deepika Padukone : दीपिका पदुकोणच्या फोटोवर आलिया भट्टने दिली प्रतिक्रिया...

३. Neeyat Trailer Out: विद्या बालन स्टारर चित्रपट 'नीयत'चे ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.