मुंबई : लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ हा सध्या चर्चेत आला आहे. व्हँकुव्हर रेस्टॉरंटमध्ये अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टसोबत त्याला स्पॉट केले गेले आहे. स्विफ्टसोबत काही फोटो हे ट्विटवर व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतर दिलजीतने या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर लगेच त्याने त्याचे ट्विट डिलीट केले होते. मात्र सध्याला त्याने डिलीट केल्या गेलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दिलजीत हा व्हँकुव्हर रेस्टॉरंटमध्ये स्विफ्टसोबत दिसत आहे. दोघेही यावेळी फार जवळ आले असे देखील देखील फोटोमध्ये दिसत आहे. तसेच यावेळी दोघांनी एकत्र जेवण या रेस्टॉरंटमध्ये केले हे सुद्धा माहित होत आहे.
गार्डने केली पुष्टी : व्हँकुव्हर रेस्टॉरंटच्या गार्डने सोमवारी रात्री कोल हार्बरमधील कॅक्टस क्लब कॅफेमध्ये जेव्हा या दोन आवडत्या स्टार्सना एकत्र जेवताना पाहिले तेव्हा व्हँकुव्हरचे रेस्टॉरंटचा गार्ड हा आश्चर्यचकित झाला. त्यानंतर या बातमीची त्यांनी पुष्टी करत सांगितले की, टेलर स्विफ्ट आणि दिलजीत दोसांझ हे दोघे हसत होते आणि एकामेंकाना स्पर्श करत होते. असे त्याने सांगितले. याशिवाय याप्रकरणी दिलजीतने कॅप्शनसह री-ट्विट केले होते, 'यार प्रायव्हिसी नाम की भी कोई चीज होती है'. त्यानंतर दिलजीतने काही तासांनंतर, ट्विट डिलीट केले. मात्र आता देखील त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
वर्कफ्रंट : प्रॉपर पटोला, डू यू नो आणि पटियाला पेग यासारखी गाणी गायल्यानंतर दिलजीत दोसांझला घराघरात ओळखल्या जाऊ लागले. त्याने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याच्या इतर मोठ्या हिट्स चित्रपटामध्ये लव्हर आणि वाइबचा समावेश आहे. तसेच त्याने बॉलिवूडमध्ये उडता पंजाब या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्याला सध्याला अनेक बॉलिवूड चित्रपटात काम मिळत आहे. दिलजीतच्या वर्क फ्रंटवर बोलायला गेले तर पुढे रिया कपूरच्या 'द क्रूम'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनन या देखील असणार आहे. तो इम्तियाज अलीच्या 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटात परिणीती चोप्रासोबत झळकणार आहे. या वर्षी कॅलिफोर्नियातील कोचेला व्हॅली म्युझिक अँड आर्ट्स फेस्टिव्हल 2023 मध्ये दिलजीतने दोनदा गाणे सादरीकरण केले होते.
हेही वाचा :