ETV Bharat / entertainment

Big B in Section 84 : ‘सेक्शन ८४’ मध्ये अमिताभ बच्चनसोबत झळकणार डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर! - बच्चनसोबत काम करणे वाटतंय स्वप्नवत

अमिताभ बच्चन यांच्या आगामी सेक्शन ८४ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करणार असून यात बिग बीसोबत डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर भूमिका साकारणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 11, 2023, 3:46 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची अभिनय भूक शमता शमत नाहीये. नुकतेच ते दुखापतीतून सावरले आणि पुन्हा कामला लागले. त्यांच्या आगामी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘सेक्शन ८४’. लवकरच याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून त्यांच्यासोबत असणार आहेत डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर. ‘सेक्शन ८४’ निर्मात्यांनी या कोर्टरूम ड्रामासाठी ताकदीचा कलाकार घेण्याचा सपाट लावलाय. या थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रिभू दासगुप्ता करीत आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक रिभू दासगुप्ता हे तिसऱ्यांदा अभिनेता-दिग्दर्शक जोडी म्हणून एकत्र येत आहेत. याआधी त्यांनी युद्ध ही मिनी सिरीज आणि तीन नावाचा सिनेमा केलेला आहे. दिग्दर्शक रिभू दासगुप्ता व्यक्त होत म्हणाले की, 'अमिताभ सरांसोबत पुन्हा काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहेच परंतु धन्य आणि सन्मानितही वाटत आहे.'

बीग बीसोबत झळकणार निम्रत कौर - सेक्शन ८४ मध्ये वर्णी लागल्याबद्दल पॉवर हाऊस परफॉर्मर निम्रत कौर म्हणाली की, 'अमिताभ बच्चन यांच्यासोबत पडद्यावर दिसणे म्हणजे अमरत्व मिळण्यासारखे आहे. त्यांच्यासोबत स्क्रीन शेयर करायला मिळतोय हा माझ्या अभिनय कारकिर्दीतील अत्त्युच्च क्षण असणार आहे. कारकिर्दीतही अत्यंत कठीण आणि साहसी भूमिका साकारायला मिळतेय त्याबद्दल रिभू दासगुप्ता यांची मी आभारी आहे!!'

अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार अभिषेक बॅनर्जी - ताकदवर अभिनेता अभिषेक बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळतेय तो क्षण एकलव्य द्रोणाचार्य भेटीसारखा असेल असे मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'हा माझा एकलव्याला त्याच्या द्रोणाचार्याला भेटण्याचा क्षण आहे. जेव्हा मला अभिनयाविषयी काहीच माहिती नव्हते, तेव्हा मला फक्त एक नाव माहित होते, आणि ते म्हणजेअमिताभ बच्चन. त्यांचे चित्रपट पाहून संमोहित झालेल्या मुलापासून ते एका फ्रेममध्ये त्यांच्यासोबत उभे राहण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी स्वर्गीय आनंदाचा क्षण आहे. खऱ्या अर्थाने माझ्यासाठी एक वर्तुळ पूर्ण केले. स्वप्न सत्यात उतरतात यावर माझा विश्वास बसलाय. रिभू दासगुप्ता यांना धन्यवाद. रिभू सर, माझ्या अंतरंगात काय चाललेय याची तुम्हाला कल्पना नाहीये आणि मी ते शब्दात मांडू शकत नाहीये.'

डायना पेंटीला बच्चनसोबत काम करणे वाटतंय स्वप्नवत - सुस्वरूप डायना पेंटी म्हणाली की, 'मिस्टर बच्चनसोबत काम करायला मिळतात हे स्वप्नवत आहे. सेक्शन ८४ हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास असेल ज्यातून खूप काही शिकायला मिळेल. ही एक रोमांचक कथा आहेच परंतु अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे हे माझे स्वप्न पूर्णत्वाला जातेय हे मला भारावून टाकतेय. मला माहित आहे की हा एक अनन्यसाधारण अनुभव असेल जो आयुष्यभ माझ्या स्मरणात राहील.' अमिताभ बच्चन अभिनित 'सेक्शन ८४’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटने जिओ स्टुडिओच्या सहकार्याने सादर होत असून याची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फिल्म हँगर यांची आहे.

हेही वाचा - Namrata Shirodkars Three Musketers : नम्रता शिरोडकरने शेअर केला तिच्या सर्वाधिक प्रिय व्यक्तींचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.