ETV Bharat / entertainment

'धूम 3'ला आज 10 वर्षे पूर्ण , आमिर खान स्टारर खलनायकानं बॉक्स ऑफिसवर उडवली होती खळबळ - धूम 3ला आज १० वर्षे पूर्ण

Dhoom 3 completes 10 years : 'धूम 3' चित्रपटाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान आता आपण या चित्रपटाबाबत काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

Dhoom 3 completes 10 years
धूम 3 ला 10 वर्षे पूर्ण होत आहेत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 12:57 PM IST

मुंबई - Dhoom 3 completes 10 years : हिंदी चित्रपटसृष्टीमधील 'धूम' फ्रँचायझीनं प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं. 2004 मध्ये सुरू झालेल्या या फ्रँचायझीनं बॉक्स ऑफिसवर खूप धूम निर्माण केली. आजही 'धूम मचाले' हे गाणे दुचाकीस्वारांच्या ओठावर आहे. या फ्रँचायझीमध्ये तीन चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊन गेले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'धूम' फ्रँचायझीचा तिसरा भाग सर्वाधिक चर्चेत होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित 'धूम 3'मध्ये अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, आमिर खान आणि उदय चोप्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 20 डिसेंबर 2013 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे.

आमिर खाननं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली : 'धूम 3' हा पहिला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं जगभरात 558 कोटीचा व्यवसाय केला. देशांतर्गत या चित्रपटानं 284.27 कोटींची कमाई केली होती. कतरिना कैफच्या कारकिर्दीतील हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. 'धूम 3'चे शूटिंग सुरुवातीला मुंबईत होणार होते, पण नंतर या च चित्रपटाचं शूटिंग शिकागोमध्ये झालं. हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. 'धूम 3' बनवण्यासाठी जवळपास 175 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.

'धूम 3'मधील स्टंट : 'धूम 3' या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, आमिर खान आणि उदय चोप्रा यांचे जबरदस्त स्टंट आहे. या चित्रपटामधील गाणं देखील खूप हिट झाली आहेत. या चित्रपटामध्ये आमिर खाननं खलनायकाची भूमिका साकारली होती. 'धूम 3'मध्ये आमिरचा डब्बल रोल होता. आमिरनं या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतली होती. यापूर्वी ही भूमिका शाहरुख खानला देण्यात आली होती, मात्र दुखापतीमुळं तो हा चित्रपट करू शकला नाही. त्यानंतर हा चित्रपट आमिर खानला ऑफर केला गेला.

हेही वाचा :

  1. दुबईत 'डंकी'चं जोरदार प्रमोशन, ड्रोन शोमध्ये साकारली किंग खानची सिग्नेचर पोज
  2. 2023 मध्ये चंदेरी दुनियेत पदार्पण करणाऱ्या स्टार किड्स विषयी जाणून घ्या
  3. किंग खानची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; 'या' प्रकरणी होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.