ETV Bharat / entertainment

Dharmendra Deol And Ranveer Singh: धर्मेंद्रने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरील रणवीर सिंगसोबतचा शेअर केला फोटो... - सेटवरचे फोटो शेअर केले

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्रने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरील रणवीर सिंगसोबतचा एक खास फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये धर्मेंद्र आणि रणवीर चर्चा करताना दिसत आहे.

Dharmendra Deol And  Ranveer Singh
धर्मेंद्र आणि रणवीर सिंग
author img

By

Published : Aug 3, 2023, 2:56 PM IST

मुंबई : सुपरस्टार धर्मेंद्र अलीकडेच नातू करण देओलच्या लग्नामुळे चर्चेत होते. नातवाच्या लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले होते, ज्यात धर्मेंद्र बाराती म्हणून नाचत होते. दरम्यान आता धर्मेंद्र 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. धर्मेंद्र यांनी इंस्टाग्रामवर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या सेटवरील रणवीरसोबतचा जुना फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये धर्मेंद्र आणि रणवीर हे मोबाईलमध्ये पाहताना दिसत आहे. थ्रोबॅक फोटो शेअर करत त्यांना काही जुने दिवस आठविले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहले 'जी चाहता है इन की चाहत के खाकून में, फिर से रंग भर दूँ', असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.

धर्मेंद्रने फोटो शेअर केला : फोटोमध्ये धर्मेंद्र रणवीर सिंगसोबत काही मुद्द्यावर चर्चा करताना दिसत आहे. पांढऱ्या कुर्त्यामध्ये धर्मेंद्र खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, रणवीरही ऑफ व्हाइट कुर्त्यामध्ये स्मार्ट दिसत आहे. धर्मेंद्रची ही पोस्ट शेअर होताच या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या कमेंट आल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, 'दोन महान तारे.' दरम्यान आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, 'सर्वोत्तम जोडी. धरम जी आणि रणवीर सिंग. इतर चाहत्यांनी लाल हार्ट इमोजीसह दोन्ही स्टार्सवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. धर्मेंद्रचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. यापूर्वी देखील धर्मेंद्रने आलियासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवर देखील चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता.

१०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल ? : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ने बॉक्स ऑफिसवर ६० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कलेक्शनचा आलेख घसरला आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर कमाई हळूहळू करत आहे. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शत केला आहे. या चित्रपटाचे खूप प्रमोशन करण्यात आले होते. दरम्यान, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये ८० कोटींचा टप्पा पार करू शकतो. या चित्रपटाने रिलीजच्या ६व्या दिवसांत ६६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

हेही वाचा :

  1. Manish Paul Birthday : मनीष पॉलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी...
  2. Na Dho Mahanor passed away: मराठी मातीतला 'रानकवी' हरपला, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली
  3. Salman Khan And Arpita Khan : सलमान खानने बहीण अर्पिता खानला एक थ्रोबॅक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.