हैदराबाद - रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी सकारात्मक समीक्षणे द्यायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी पहिला शो (FDFS ) पाहणाऱ्या डायहार्ड फॅन्समध्ये अनेक दिग्गज स्टार्स आणि सेलेब्रिटींचाही समावेश आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हादेखील रजनीकांतचा जबरा फॅन आहे. धनुष त्याच्या आगामी चित्रपटातील लूकसह 'जेलर'चा पहिला शो पाहण्यासाठी आला होता.
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत ही जोडी रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटाच्या पहिल्या शोचे प्रेक्षक असतात. धनुषने आधी एका ट्विटमध्ये उल्लेख केला होता की चित्रपट दोन दिवसांत थिएटरमध्ये येत आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी 'जेलर' पाहणे चुकवणार नाही.
-
🚨@dhanushkraja Right now in @RohiniSilverScr to watch #Jailer FDFS 🤗#CaptainMiller pic.twitter.com/iioKLHrwMk
— Dhanush Trends ™ (@Dhanush_Trends) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🚨@dhanushkraja Right now in @RohiniSilverScr to watch #Jailer FDFS 🤗#CaptainMiller pic.twitter.com/iioKLHrwMk
— Dhanush Trends ™ (@Dhanush_Trends) August 10, 2023🚨@dhanushkraja Right now in @RohiniSilverScr to watch #Jailer FDFS 🤗#CaptainMiller pic.twitter.com/iioKLHrwMk
— Dhanush Trends ™ (@Dhanush_Trends) August 10, 2023
ऐश्वर्या आणि धनुष यांनीच केवळ 'जेलर'च्या पहिल्या दिवसाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली नाही, तर राघव लॉरेन्स आणि रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांतही यावेळी उपस्थित होते. काही लोकांच्या माहितीसाठी सांगायचे तर धनुष हा रजनीकांतचा जावई आहे. ऐश्वर्या रजनीकांतशी त्याचा विवाह झाला होता. १८ वर्षे संसार केल्यानंतर ते आता विभक्त झाले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर 'जेलर'चा उत्सव सुरू झाला आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून सिनेमाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आठवड्याच्या मध्यात चित्रपट रिलीज झालेला असतानाही 'जेलर' चित्रपट विक्रमी संख्येने स्क्रीनवर लॉन्च झाला आहे. चित्रपटाबद्दल तयार झालेल्या वातावरणाचा अंदाज घेतला तर लक्षात येते की चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे.
'जेलर' चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत एका पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. याशिवाय प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. मल्याळम अभिनेता मोहनलाल यांची कॅमिओ भूमिका चित्रपटात आहे.
हेही वाचा -
३. Kushi trailer launch: 'खुशी'साठी सामंथाची कितीही प्रतीक्षा करण्यास तयार होता विजय देवराकोंडा