मुंबई - Dhanush begins D51 shoot : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता धनुष स्टारर 'कॅप्टन मिलर' हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करत आहे. दरम्यान, धनुष त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं नाव 'डी51' ( तात्पुरते शीर्षक असलेला चित्रपट) आहे. या चित्रपटामध्ये धनुषसोबत रश्मिका मंदान्ना, नागार्जुन अक्किनेनी आणि शेखर कममुला दिसणार आहेत. निर्मात्यांनी कार्थी स्टारर 'सुलतान' आणि थलापथी विजय स्टारर 'वारिसु' नंतर तिसऱ्या तमिळ चित्रपटात रश्मिका मंदान्नाला मुख्य भूमिकेत कास्ट केलं आहे.
-
A blockbuster voyage that's bound to resonate with the nation! 😎#DNS kicks off with a pooja ceremony and the shoot begins with a key schedule 🎥
— Sree Venkateswara Cinemas LLP (@SVCLLP) January 18, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details on the way ⏳@dhanushkraja @iamnagarjuna @iamRashmika @sekharkammula @AsianSuniel @puskurrammohan @SVCLLP pic.twitter.com/bYBtyuwfGA
">A blockbuster voyage that's bound to resonate with the nation! 😎#DNS kicks off with a pooja ceremony and the shoot begins with a key schedule 🎥
— Sree Venkateswara Cinemas LLP (@SVCLLP) January 18, 2024
More details on the way ⏳@dhanushkraja @iamnagarjuna @iamRashmika @sekharkammula @AsianSuniel @puskurrammohan @SVCLLP pic.twitter.com/bYBtyuwfGAA blockbuster voyage that's bound to resonate with the nation! 😎#DNS kicks off with a pooja ceremony and the shoot begins with a key schedule 🎥
— Sree Venkateswara Cinemas LLP (@SVCLLP) January 18, 2024
More details on the way ⏳@dhanushkraja @iamnagarjuna @iamRashmika @sekharkammula @AsianSuniel @puskurrammohan @SVCLLP pic.twitter.com/bYBtyuwfGA
धनुष करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन : या चित्रपटात काम करण्यासोबतच, धनुष यावर्षी प्रदर्शित होणार्या इतर दोन चित्रपटांसाठी देखील दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसला आहे. त्याचा पहिला चित्रपट 'निलावुक्कु एन मेल एन्नाडी कोबम' आहे, जो 2024मध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटामध्ये पाविश, अनिखा सुरेंद्रन, प्रिया प्रकाश वारियर, मॅथ्यू थॉमस, वेंकटेश मेनन, राबिया खातून आणि रम्या रंगनाथन यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला संगीत जीव्ही प्रकाश कुमार यांनी दिलं आहे. याशिवाय धनुष तात्पुरते शीर्षक असलेल्या 'डी50' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसेल.
धनुष स्टारर 'कॅप्टन मिलर' : 'डी50' हा चित्रपट एसजे सूर्या, कालिदास जयराम, संदीप किशन स्टारर पिरियड गँगस्टर चित्रपट असेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाचे संगीत ए .आर रहमान यांनी दिले आहे. धनुष अलीकडेच अरुण माथेस्वरन दिग्दर्शित 'कॅप्टन मिलर' या चित्रपटात दिसला, ज्यात प्रियांका अरुल मोहन, शिवा राजकुमार, संदीप किशन आणि इतर अनेक कलाकार दिसले आहेत. 'कॅप्टन मिलर'नं आतापर्यत 38.43 कोटीची देशांतर्गत कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 50 कोटीचा टप्पा बॉक्स ऑफिसवर गाठेल, अशी अपेक्षा आता चित्रपट निर्माते करत आहेत. 'कॅप्टन मिलर' चित्रपट 50 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाकडून धनुषला खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :