ETV Bharat / entertainment

Dhak Dhak title track Re Banjara out : दिया मिर्झा, फातिमा सना शेखसह महिलांची अनोख्या अवतारातील रोड ट्रीप - Dhak Dhak title track Re Banjara out

Dhak Dhak title track Re Banjara out : दिया मिर्झा, फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह आणि संजना संघी यांच्या आगामी 'धक धक' चित्रपटातील 'रे बंजारा' हे शीर्षक गीत लॉन्च करण्यात आलं. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Dhak Dhak title track Re Banjara out
धक धक चित्रपटाचं टायटल ट्रॅक लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 5:09 PM IST

मुंबई - Dhak Dhak title track Re Banjara out : तापसी पन्नूच्या आऊटसायडर्स फिल्म या प्रॉडक्शन हाऊसने निर्मिती केलेल्या 'धक धक' चित्रपटातील 'रे बंजारा' या शीर्षक गीताचे लॉन्चिंग करण्यात आलं आहे. या गाण्यात अभिनेत्री दिया मिर्झा, फातिमा सना शेख, संजना सांघी आणि रत्ना पाठक शाह यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या अवतारात झळकल्या आहेत. या सुंदर गाण्याच्या पार्श्वभूमीवर या महत्त्वकांक्षी महिला त्यांच्या बाईकवरुन रोड ट्रिपला जाताना दिसतात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अभिनेत्री फातिमा सना शेखने हे शीर्षक गीत इन्स्टाग्रामवर कॅप्शनसह अपलोड केले आहे, दोन चाकं, कधीही न संपणारा रस्ता आणि अविस्मरणीय आठवणींचा 'धक धक' टायटल ट्रॅक 'रे बंजारा' लॉन्च झाला. हा चित्रपट 13 ऑक्टोबरपासून थिएटरमध्ये पाहता येईल. 'रे बंजारा' हे गाणे ऋषी दत्ता यांनी संगीतबद्ध केलंय, तर सुनिधी चौहान आणि जतिंदर सिंग यांनी गायलं आहे. रे बंजारा या शीर्षक गीतात बाबा बुल्ले शाह आणि कुंदन विद्यार्थी यांचे बोल आहेत.

तरुण दुडेजा दिग्दर्शित 'धक धक' चित्रपटात बॉलिवूड स्टार्स फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना संघी मुख्य भूमिका साकारत आहेत. 'धक धक' 13 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या संपूर्ण प्रमुख कलाकारांना गाण्याच्या पोस्टरवर स्थान देण्यात आलंय.

या चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी चार महिला आहेत. भावना, रोमांच आणि शोध यासाठीच्या विलक्षण प्रवासासाठी त्या दिल्ली ते खारदुंगला बाइक ट्रिपमध्ये उत्साहात सामील होतात. त्यांच्या प्रवासाने त्यांचे भविष्य कसे कायमचं बदलले याचा त्या शोध घेतात. वायाकॉम 18 आणि तापसी पन्नू यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. असं असलं तरी चित्रपटाचे योग्य प्रकारे प्रमोशन न होऊ शकल्यानं तापसीने यातून आपले अंग काढून घेतल्याचं बोललं जातंय.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी चांगले बजेट ठेवण्यात आलं होत. सर्वोत्कृष्ट कलाकारांना यात सामील करण्यात आलंय. धक धक चित्रपटातील आघाडीच्या नायिकांनी अलिकडेच सोशल मीडियावर त्यांचा सिनेमा रिलीज झाल्याची घोषणा केली होती. याव्यतिरिक्त, त्यांनी धक धकचे पोस्टरही शेअर केलं होतं. यामध्ये त्या त्यांच्या बाइकसह पोज देताना डॅशिंग दिसत होत्या. 'अखेर चित्रपटाची प्रतीक्षा संपली! या कथेचा एक भाग बनणे इतके भारी आहे की मी ते व्यक्त करू शकत नाही. धक धक १३ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे,' असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होतं.

हेही वाचा -

  1. Thank You For Coming X Review: भूमी पेडणेकर आणि शहनाज गिलच्या सेक्स कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मनं

2. Tiger 3 Trailer Countdown Start : 'टायगर 3' ट्रेलरसाठी उलटी गिनती सुरू, सलमान कतरिनाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

3. Kriti Sanon On Ideal Partner : जोडीदारात काय शोधते क्रिती सेनॉन? प्रभाससोबत डेटिंगच्या चर्चेवर केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.