ETV Bharat / entertainment

Deepika Ranveer wedding video : दीपिका आणि रणवीर सिंगची वेडिंग फिल्म्स 'कॉफी विथ करण 8' मध्ये लॉन्च - Deepika Ranveer wedding video

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या शाही विवाहला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. ही जोडी 'कॉफी विथ करण 8' च्या पहिल्या भागात आली असताना त्यांच्या लग्नाचा व्हडिओ चाहत्यांसाठी लॉन्च करण्यात आला. यात विवाह प्रसंगातील अनेक सुंदर क्षण दिसतात.

Deepika Ranveer wedding video
दीपिका आणि रणवीर सिंगची वेडिंग फिल्म्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 12:00 PM IST

मुंबई - दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं मानलं जात. ही जोडी 'कॉफी विथ करण 8' च्या पहिल्या भागात आली होती. यावेळी नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे त्यांनी भरपूर गप्पा मारल्या, अनेक नव्या गोष्टींचे खुलासे केले आणि त्यांच्या लग्नाचा व्हिडिओही चाहत्यांसाठी शेअर केला. दीपिका पदुकोणच्या 'ये जवानी है दिवानी' मधील वेडिंग सिक्वेन्स शूट करणाऱ्या द वेडिंग फिल्मर्सने लग्नाचा हा व्हिडिओ बनवला होता.

द वेडिंग फिल्मर्सने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले,' 'ये जवानी है दिवानी' चित्रपटातील 'कबीरा' गाण्याच्या शुटिंगदरम्यान मला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली होती. एका रम्य संध्याकाळी तलावाच्या कडेला ती हळुवारपणे म्हणाली, जेव्हा माझ्या लग्नाची वेळ येईल तेव्हा तुम्ही ते कॅप्चर कराल, तर मला सन्मानाचं वाटेल. तिच्या या बोलण्याचं मला आश्चर्य वाटले. आता अनेक वर्षांनी तिच्या लग्नाचा व्हिडिओ प्रदर्शित करताना त्या कुजबुजीत दिलेल्या हळुवार वचनाची आठवण येते. निसर्गाच्या सुंदर पार्श्वभूमीवर रणवीर आणि दीपिकाचं जादुई मिलन उलगडून दाखवण्याचा मान द वेडिंग फिल्मरला मिळाला. हे केवळ लग्नाचं डॉक्युमेंटेशन नव्हतं कर प्रेमाची कहाणी विणण्यासारखं होतं. काही कथा हृदयाच्या इतक्या जवळ असतात की त्या जवळ ठेवल्या जातात, आणि त्यांची ही कथा काही काळासाठी एकटीच असावी अशी त्यांची इच्छा होती. आमच्या उद्योगाची १३ वर्षे साजरी करत असताना रणवीर दीपिकाच्या विवाहाची ही सुंदर फिल्म 'कॉफी विथ करण'च्या प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रीमियर करताना एक मैलाचा दगड गाठल्यासारखं वाटतंय.'

व्हिडिओची सुरुवात रणवीरच्या बोलण्यानं होते. तो म्हणतो की, त्यानं दीपिकाशी लग्न करायचं आधीच ठरवलं होतं आणि अखेर तो दिवस उजाडला आहे. यामध्ये रणवीर आणि दीपिकाच्या विवााहातील सुंदर क्षणांसह त्यांच्या कुटुंबीयांची मनोगतंही ऐकायला मिळतं. दीपिकाचे वडील आणि दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण प्रकाश पदुकोण व्हिडिओमध्ये म्हणतात की, आम्ही चारही जण खूप बोरींग माणसं आहोत पण रणवीरमुळे आमच्यातही उत्साह संचारतो. व्हिडिओमध्ये तलावाजवळील मेहंदी समारंभात रणवीरचा डान्स, दीपिकाचं सजणं, मंडपात होणारे विवाह विधी आणि आनंदी सोहळा पाहायला मिळतो.

  • for the first time ever on #koffeewithkaran I felt sorry for karan. his reaction was so genuine after watching deepika and ranveer’s wholesome wedding video. man was sad he wanted someone to live his best life with. poor dude is rich af yet so lonely😭

    pic.twitter.com/IXVyfKKex5

    — desiburgerbacha (@shortiekiddo28) October 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये रणवीरला दीपिकाच्या खोलीबाहेर वाट पाहण्यासाठी थांबलेले दाखवण्यात आलंय आणि तो आपल्या नवविवाहित पत्नीला ‘लव्ह यू बेबी’ म्हणत प्रेमानं हाक मारताना दिसतो. व्हिडिओत एका क्लिपमध्ये दीपिका म्हणते की, 'मी ज्याच्याकडे आकर्षित झाले त्याला साऱ्या जगानं पाहिलंय. त्याची दुसरी बाजू अतिशय शांत, बुद्धिमान आणि संवेदनशील आहे. तो रडतो हे सत्य आहे आणि मला ते आवडते. तो जे काही करतो ते अगदी मनापासून करतो.'

रणवीर दीपिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करण जोहरही भावूक झाला. 'दोघांची गुपचूप एंगेजमेंट झाली आहे का', याचीही चौकशी करण जोहरने चर्चेच्यादरम्यान केली. यावर रणवीरनं सांगितलं की, '2015 मध्ये मी तिला प्रपोज केले होते, इसके पहले की कोई और आ जाए मैं जाके चप्पल रख देता हू.'

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या अलिकडेच रिलीज झालेल्या चित्रपटात रणवीर सिंगनं रॉकी रंधावा ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या संदर्भ देत त्यानं दीपिकाला विचारलं की, 'ती रॉकी रंधावाला डेट करणार का?' यावर दीपिका पदुकोणने उत्तर दिले, 'मी रॉकी रंधावाशी लग्न केले आहे.'

इटलीच्या लेक कोमो येथे 14 नोव्हेंबर 2018 रोजी रणवीर आणि दीपिका या बहुचर्चित जोडप्याचा विवाहसोहळा पार पाडला. दोघांनी पारंपारिक दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न केलं आणि एका दिवसानंतर उत्तर भारतीय पद्धतीनं विवाहसोहळा पार पडला. या जोडप्याने संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

हेही वाचा -

  1. Ias Abhishek Singh Album : माजी आयएएस अभिषेक सिंग सनी लिओनीसोबत करणार रोमान्स; व्हिडिओ व्हायरल...

2. Asin Share Pics And Video : मुलगी अरिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करण्यासाठी असिननं एका वर्षानंतर इंस्टाग्रामवर केले पुनरागमन...

3. Soni Razdan Birthday : 'तू आमचं सर्वस्व आहेस', म्हणत आलिया भट्टनं दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.