ETV Bharat / entertainment

Ranveer Singh birthday : रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्य दीपिकाने शेअर केला क्रिस्पी केक, करण जोहरनेही दिल्या शुभेच्छा - करण जोहर

दीपिका पदुकोणने काल रात्री पती रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानीचा दिग्दर्शक करण जोहरनेही सेटवरील बीटीएस फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Ranveer Singh birthday
रणवीर सिंग वाढदिवस
author img

By

Published : Jul 6, 2023, 1:15 PM IST

मुंबई - 'बँड बाजा बारात' फेम बॉलिवूडचा एनर्जटिक अभिनेता रणवीर सिंग ६ जुलै रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, रणवीर सिंग याला चाहते आणि सेलिब्रिटींकडून भरभरुन शुभेच्छा मिळत आहेत. काही वेळापूर्वी, रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा दिग्दर्शक करण जोहरने चित्रपटाच्या सेटवरील बीटीएस फोटो शेअर करत त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा दिल्या.

दरम्यान रणवीर सिंगला एक खास अभिनंदनाचा संदेश त्याच्या खास व्यक्तीकडून मिळाला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नी दीपिका पदुकोण आहे. दीपिकाने काल रात्री एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये दीपिका पदुकोणने क्रिस्पी केकचा फोटो शेअर केला आहे, पण या पोस्टमध्ये दीपिकाने तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे कुठेही लिहिलेले नाही.

पत्नी दीपिकाच्या या पोस्टवर रणवीर सिंगची कमेंट लक्ष वेधणारी आहे. रणवीर सिंगनेही त्याची लाडकी पत्नी दीपिकाच्या पोस्टवर ओहो कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे. या जोडप्याने २०१८ मध्ये लग्न केले, तेव्हापासून हे सुंदर जोडपे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असते. ते कधीही सुट्टीवर किंवा कामा निमित्य बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यातील घट्ट नाते प्रकर्षाने जाणवते.

वर्क फ्रंटवर, रणवीर सिंग त्याच्या आगामी कौटुंबिक ड्रामा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या रिलीजची प्रतीक्षा करत आहे. हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट असणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर व एक गाणे रिलीज झाले असून रणवीर आणि आलियाच्या चाहत्यांना या गोष्टी पसंतीस उतरल्या आहेत.

त्याचबरोबर दीपिका पदुकोण तिच्या आगामी प्रोजेक्ट आणि फायटर या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी जानेवारी २०२४ मध्ये रिलीज होणार आहेत. अलिकडेच तिचा शाहरुखसोबतचा पठाण चित्रपट सुपरहिट ठरला होता.

हेही वाचा -

१. Sameer Wankhede Issue : लाच घेणारा तसेच लाच देणारा देखील आरोपी; समीर वानखेडेंच्या वकिलांचा न्यायालयात सवाल

२. Sana Khan Welcome Baby Boy : बिग बॉस 6 फेम सना खान आणि पती मुफ्ती अनसच्या घरी पाळणा हलला, पाहा एनिमेटेड व्हिडिओ

३. Spkk Box Office Collection Day 7 : 'सत्यप्रेम की कथा'ने 50 कोटींचा आकडा पार केला, एका क्लिकवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन पहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.