ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan Deepika Padukone : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा व्हिडिओ झाला व्हायरल... - शाहरुख खान जवान

Shahrukh khan and deepika padukone : बॉलिवूडचा किंग खानच्या 'जवान'नं बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा विक्रम रचला आहे. त्यानिमित्तानं 15 सप्टेंबरला 'जवान'च्या यशाबद्दल पार्टी करण्यात आली. या पार्टमध्ये चित्रपटामधील काही कलाकार उपस्थित होते. दरम्यान आता या पार्टीमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये किंग खान हा दीपिकासोबत डान्स करत आहे.

Shahrukh khan and deepika padukone
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 11:26 AM IST

मुंबई - shahrukh khan and deepika padukone : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट हा रूपेरी पडद्यावर खूप कमाई करत आहे. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली दिग्दर्शित 'जवान'नं बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. हा एका आठवडा या चित्रपटासाठी खूप खास होता. या चित्रपटानं एका आठवड्यात अनेक विक्रम केले आणि मोडले. रिलीजच्या 9व्या दिवशी या चित्रपटानं शानदार कमाई करत 400 कोटींचा मोठा आकडा गाठला. या चित्रपटानं नऊ दिवसात 410.88 कोटीची कमाई केली आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्हिडिओ झाला व्हायरल : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दीपिका ही किंग खानसोबत डान्स करताना दिसत आहे. 'जवान' चित्रपटामध्ये दीपिकानं जबरदस्त कॅमिओ केला आहे. दीपिकाला पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. हा व्हिडिओ 'जवान'च्या सक्सेस पार्टीचा आहे.

'रमैया वस्तावैय्या'वर या गाण्यावर स्टारकास्ट डान्स केला : शाहरुखसोबतच चित्रपटातील स्टारकास्ट दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर. विजय सेतुपती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली हे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी जवानमधील 'रमैया वस्तावैया' गाण्यावर डान्स केला. या कार्यक्रमाला नयनतारा काही कारणास्तव उपस्थित राहू शकली नाही, त्यामुळं तिनं व्हिडिओ संदेशद्वारे अनुपस्थितीचं कारण सांगितलं. 'जवान'च्या सक्सेस पार्टीमध्ये दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबत चित्रपटातील 'चलेया तेरी ओर...' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. दीपिका या पार्टीत देसी स्टाईलमध्ये दिसली.

किंग खान म्हटलं धन्यवाद : शाहरुखनं एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये संपूर्ण 'जवान'ची संपूर्ण टीम 'रमैय्या वस्तावैय्या' या गाण्यावर डान्स करत आहे. किंग खान या कार्यक्रमामधील शेअर करत कॅप्शनमध्ये शाहरुखनं लिहिलं की, 'जवान माझ्यासोबत सेलिब्रेट केल्याबद्दल धन्यवाद'. शाहरुखच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने लिहिले, 'ऑन द फायर'. तर दुसर्‍याने लिहिले, 'जवान' चित्रपट जबरदस्त आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे.

हेही वाचा :

  1. Ganesh festival 2023 : बाप्पाच्या आगमनासाठी कंगना रणौतचा उत्साह शिगेला, शेअर केला उत्सवी व्हिडिओ
  2. Junaid Khan Bollywood Debut : आमिर खानचा मुलगा जुनैद 'महाराजा'मधून करणार नेटफ्लिक्सवर एन्ट्री
  3. Old womens dance on Jawan song : शाहरुखच्या 'चलेया' गाण्यावर डान्स करताना ६५ वर्षाची महिला झाली 'जवान'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.