ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणला जुन्या फोटोवरुन केले जातंय ट्रोल, जाणून घ्या या मागचे सत्य

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण पठाणच्या ड्रेसनंतर भगव्या सँडलमुळे पुन्हा वादात सापडली आहे. दीपिकाचा भगव्या सँडलसह फोटो शेअर झाल्याने अनेक सोशल साइट्स यूजर्स तिला सतत ट्रोल करत आहेत. वाचा पूर्ण बातमी..

दीपिका पदुकोणला जुन्या फोटोवरुन केले जातंय ट्रोल

author img

By

Published : Jan 12, 2023, 3:01 PM IST

नवी दिल्ली - दीपिका पदुकोणचा भगवा रंग काही पिच्छा सोडत नाहीये. पठाणमधील दीपिकाच्या ड्रेसवरून झालेल्या वादानंतर दीपिका पदुकोणच्या भगव्या सँडलवरून वाद सुरू झाला आहे. ट्रोलर्स सोशल साइट्सवर भगव्या चपलाचा फोटो शेअर करून ट्रोल करत आहेत. पठाणच्या बेशरम रंगच्या वादावर दीपिका पदुकोणवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्यांना चिडवण्यासाठी दीपिकाने भगव्या रंगाच्या चप्पल घातलेला फोटो शेअर केल्याचा दावा फोटो शेअर करणाऱ्यांकडून केला जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा भगव्या रंगाच्या सँडलसह निळ्या आणि पांढर्‍या पट्टेदार पँट शूटचा फोटो व्हायरल होत आहे. पठाण गाण्याच्या वादातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत बहिष्काराची हाक दिल्याचा दावा या फोटोसह केला जात आहे. अलीकडेच दीपिका भगवी चप्पल घालून पठाण चित्रपटाला विरोध करणाऱ्यांची छेड काढत असल्याचा दावा केला जात आहे.

2019 मध्ये, कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाच्या सँडलसह निळ्या आणि पांढर्‍या पट्टेदार पँट शूटमध्ये फोटोशूट केले. दीपिका पदुकोण 2019 च्या फोटोचा अलीकडील फोटो म्हणून पठाणमधील भगव्या ड्रेसच्या वादाशी संबंध जोडल्याने पुन्हा ट्रोल होत आहे.

2019 मध्ये फ्रान्समधील कान्स महोत्सवातील वोग इंडिया मॅगझिनमधील दीपिका पदुकोणचा फोटो

दीपिका पदुकोणचा भगव्या रंगाच्या सँडल घातलेला फोटो जो व्हायरल होत आहे, तो पीटीआय फॅक्ट चेक या वृत्तसंस्थेमध्ये बरोबर आढळला आहे. हा फोटो 2019 मध्ये फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यानचे आहे, जे Vouge India सह अनेक चित्रपटांशी संबंधित वेबसाइटवर उपलब्ध आहे. वोग इंडियाच्या म्हणण्यानुसार, हा फोटो 72 व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यानचा आहे.

पठाण चित्रपटाला विरोध काही राजकीय संघटना करत आल्या आहेत. यासाठी ते काही तरी वादग्रस्त शोधत असतात. बेशरम रंगमध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी परिधान केली होती. याच गाण्यात तिने इतर अनेक रंगाचे ड्रेसही घातले होते. मात्र भगव्या बिकनीवरुन तिला व शाहरुखला ट्रोल करणे सुरु झाले आणि त्यानंतर पठाण चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी मोहीमही सुरू झाली. दरम्याने सेन्सॉर बोर्डाने या गाण्यावर कात्री चालवण्याचा सल्ला निर्मात्यांना दिला. त्यानंतर पठाणचा ट्रेलर रिलीज झाला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात वादग्रस्त काहीच न सापडल्याने पठाण विरोधी गट काहीतरी उकरुन काढण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून दीपिकाच्या ४ वर्षापूर्वी कान्स महोत्सवात परिधान केलेल्या ड्रेसवरुन वाद छेडण्याचा प्रयत्न झाला आहे. दीपिकाचा हा फोटो लेटेस्ट असल्याच्या अफवाही पसरवल्या जात आहेत.

हेही वाचा - शेहजादाचा ट्रेलर पाहून कार्तिक आर्यनच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.