मुंबई - Deepika Kiss SRK : ग्लोबल स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण ही बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जवळच्या मैत्रीणींपैकी एक आहे. 'ओम शांती ओम' या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटापासून त्यांच्यातील नातं घट्ट बनत गेलं आणि ते एकमेकांचे आधारस्तंभ बनले.
शाहरुखच्या जवान चित्रपटात दोघेही अलिकडेच झळकले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं आहे. चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने शुक्रवारी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी दीपिका आणि शाहरुखच्या मैत्रीपूर्ण व्यवहाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
चलेया गाण्यावर एकत्र डान्स करण्यापासून ते एकमेकांविषयी मनमोकळ्या गप्पा मारण्यापर्यंत दोघांनी कार्यक्रमात आपल्या अतुट मैत्रीच्या नात्याचे प्रदर्शन केलं. कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर दीपिका पदुकोणने अनेक फोटोंचा संच शेअर केलाय. यात पांढऱ्या शुभ्र साडीत ती पारंपरिक वेशभूषेत दिसत होती.
यातील एका फोटोने सर्वांचे लक्ष थोडे जास्त वेधून घेतलं. हा फोटो आहे तिचा आणि शाहरुख खानचा. या फोटोत दीपिका शाहरुखच्या गालावर चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. दीपिका आणि शाहरूखचा हा सर्वात सुंदर फोटो आहे हे वेगळे सांगण्याची गरज पडणार नाही.
या फोटोवर दीपिकाला भरपूर कमेंट्स येताहत. विशेष म्हणजे दीपिकाचा पती रणवीर सिंगनेही यावर आपली प्रतिक्रिया लिहिलीय. 'इश्क में दिल बना है इश्क में दिल फन्ना है...', अशी त्यानं 'चलेया' गाण्याच्या ओळी वापरून प्रतिक्रिया लिहिलीय.
जवान चित्रपटाच्या सक्सेस कार्यक्रमात शाहरुख खान अतिशय हटके लूकमध्ये हजर होता. त्यानं बकल स्ट्रॅप क्लोजर असलेला ब्लॅक ब्लेझर परिधान केला होता. स्ट्रेट-फिटेड पॅंट आणि पांढऱ्या शर्टने त्याने त्याला पूरक बनवलं होतं. किंग खाननं आपल्या हेअरस्टाइलने आपला लूक अधिक आकर्षक बनवल्याचं दिसतंय.
कार्यक्रमादरम्यान मीडियाशी संवाद साधताना शाहरुख खान दीपिकाला उद्देशून म्हणाला, मला या दिवसाचं महत्त्व सांगायचंय. अर्थातच, हा जवान चित्रपटातील सर्व कलाकार, सर्व कलाकारांसह, सर्वांचा उत्सव आहे... फार क्वचितच आपल्याला वर्षानुवर्षे एखाद्या चित्रपटासोबत सलग काम करण्याची संधी मिळते. जवान चित्रपटाला कोविड आणि वेळेच्या कमरतेमुळे विलंब झाला. परंतु या चित्रपटात बरेच लोक सामील होते, विशेषत: साऊथकडील लोक आले आणि मुंबईत स्थलांतरित झाले आणि गेली चार वर्षे मुंबईत राहून या चित्रपटासाठी रात्रंदिवस काम केलं. यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात कठीण चित्रपट आहे. अनेक लोक आपल्या घरीही जाऊ शकले नाहीत. आमचे दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्यासारख्यांची मुलंही इथंच झाली.
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला. यात दीपिका पदुकोण एका खास कॅमिओ भूमिकेमध्ये आहे.
हेही वाचा -
२. Shah Rukh Khan Deepika Padukone : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा व्हिडिओ झाला व्हायरल...
३. Jaane Jaan Promotion :'जाने जान' प्रमोशनमध्ये पिवळ्या लिंबू साडीसह करीनानं प्रेक्षकांना केलं घायाळ