ETV Bharat / entertainment

साजिद खानला बिग बॉसमधून हाकला, स्वाती मालीवाल यांची अनुराग ठाकूरांकडे मागणी

"#MeToo चळवळीदरम्यान दहा महिलांनी साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवतात. आता या व्यक्तीला बिग बॉसमध्ये स्थान देण्यात आले आहे, जे चुकीचे आहे. मी, अनुराग ठाकूर यांना साजिद खानला या शोमधून काढून टाकण्याबद्दल लिहिले आहे," असे दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.

साजिद खानला बिग बॉसमधून हाकला
साजिद खानला बिग बॉसमधून हाकला
author img

By

Published : Oct 10, 2022, 3:12 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख ( Delhi Commission for Women chief ) स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur ) यांना पत्र लिहून #MeToo चळवळीदरम्यान अनेक महिलांनी ज्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले, त्या चित्रपट निर्माता साजिद खानला ( Sajid Khan ) बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. बिग बॉसच्या 16व्या सीझनचा पहिला भाग 1 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. तेव्हापासून स्पर्धक म्हणून असलेला साजिद खान शोमध्ये झळकत आहे. हा शो अभिनेता सलमान खान होस्ट करतो आहे.

  • साजिद खान के ख़िलाफ़ 10 महिलाओं ने #MeToo मूव्मेंट के दौरान यौन शोषण के आरोप लगाए थे। ये सभी कम्प्लेंट साजिद की घिनौनी मानसिकता दिखाती है। अब ऐसे आदमी को Bigg Boss में जगह दी गयी है जो कि पूरी तरह ग़लत है। मैंने @ianuragthakur जी को पत्र लिखा है की साजिद खान को इस शो से हटवाएँ! pic.twitter.com/4ao9elyvkk

    — Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"#MeToo चळवळीदरम्यान दहा महिलांनी साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवतात. आता या व्यक्तीला बिग बॉसमध्ये स्थान देण्यात आले आहे, जे चुकीचे आहे. मी, अनुराग ठाकूर यांना साजिद खानला या शोमधून काढून टाकण्याबद्दल लिहिले आहे," असे मालीवाल यांनी सोमवारी हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर 2018 मध्ये इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) ने त्याला एका वर्षासाठी निलंबित केले होते. त्या वर्षाच्या सुरुवातीला, त्याला "हाऊसफुल 4" चे दिग्दर्शक म्हणून देखील पायउतार व्हावे लागले होते आणि त्याच्या जागी फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

हेही वाचा - Kbc 14: शोमध्ये जया बच्चनच्या प्रश्नानंतर बिग बींच्या डोळ्यात दाटले अश्रू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.