ETV Bharat / entertainment

भारत भेटीत डेव्हिड बेकहॅमनं गाठीला बांधला नात्यांचा गोतावळा - Party for Buckham at Sonam Kapoors house

David Beckham pens appreciation note : डेव्हिड बेकहॅम भारताच्या दौऱ्यावर असताना त्यानं मुंबईला भेट दिली आणि अनेक नवे मित्र आणि नाती जमा केली. शाहरुख खान आणि सोनम कपूरच्या घरी त्याचं भव्य स्वागत झालं होतं. मायदेशी परतताना त्यानं या नव्या मित्रांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलंय.

David Beckham pens appreciation note
डेव्हिड बेकहॅमनं गाठीला बांधला नात्यांचा गोतावळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 10:20 AM IST

मुंबई - David Beckham pens appreciation note : जागतिक फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम भारताच्या दौऱ्यावर असताना त्याची मुंबई भेट खूपच फलदायी ठरलीय. शाहरुख खाननं मन्नत या त्याच्या निवास स्थानी बेकहॅमचं स्वागत केलं आणि त्याच्यासोबत पार्टीही आयोजित केली. गौरी खान व त्याच्या मुलांसोबत डेव्हिड बेकहॅमनं छान संध्याकाळ घालवली. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा आनंद घेतल्यानंतर तो अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी पार्टीसाठी पोहोचला होता. सोनम आणि तिचा पती आनंद आहुजानं त्याच्यासाठी भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं.

आता भारत दौरा संपवून मायदेशी परतताना डेव्हिड बेकहॅमनं शाहरुख खान व सोनम कपूरसाठी सुंदर चिठ्ठी लिहून त्यांचे आभार मानले आहेत. मुंबई भेटीत त्यांनी यजमान म्हणून केलेल्या सेवेचं कौतुक करत त्यांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रणही दिलंय.

शाहरुख खानला आपला मित्र म्हणून संबोधत बेकहॅमने लिहिले, "गौरी खान व त्याची सुंदर मुलं आणि जवळच्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी शाहरुख खान या महान व्यक्तीनं आपल्या घरी स्वागत केल्याबद्दल सन्मान वाटतो. माझ्या भारत दौऱ्याचा समारोप करण्यासाठी हा सर्वात खास मार्ग होता. धन्यवाद माझ्या मित्रा - तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे माझ्या घरी कधीही स्वागत आहे...", असं त्यानं शाहरुखला उद्देशून लिहिलंय.

सोनम आणि तिचा नवरा आनंद यांच्याकडूनही प्रेमानं भव्य स्वागत केल्याल्यावर, बेकहॅमने लिहिले, " सोनम कपूर आणि आनंद आहुजा, या आठवड्यात तुम्ही यजमान म्हणून माझं प्रेमानं स्वागत केलंत. तुमच्या घरी निर्माण केलेल्या अप्रतिम संध्याकाळबद्दल धन्यवाद - लवकरच पुन्हा भेटू."

सोनम कपूरच्या घरी डेव्हिड बेकहॅमसोबतच्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक तारे तारके आणि सेलेब्रिटी यांनी हजेरी लावली होती. सोनम कपूरचे वडील अनिल कपूर, भाऊ हर्षवर्धन कपूर आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे त्याचे फोटो व्हायरल झालेत.

डेव्हिड बकहॅमचा भारताचा दौरा खूपच रंजक झाला आणि या भेटीत त्यानं अनेक लोकांच्या भेटी घेऊन नवे मित्र जमा केले. बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझिलंड उपात्य सामन्याच्या वेळी बेकहॅम वानखेडे स्टेडियमवर हजर होता. इथे तो सचिन तेंडूलकरला भेटला आणि सामन्याचा आनंदही घेतला. युनिसेफचा गुडविल अम्बॅसेडर असलेल्या डेव्हिड बेकमहॅमने यावेळी वानखेडेवर सचिनसोबत फुटबॉलही खेळला. या सामन्यात विराट कोहलीनं सचिनच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक करण्याचा सचिनचा विक्रम मोडला. विराटचं अभिनंदन करतानाही यावेळी बेकहॅम दिसला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, निता अंबानी, अभिनेत्री सारा अली खान यासह अनेक बड्या व्यक्तींना आणि सेलेब्रिटींना डेव्हिड बेकहॅमला भेटता आलं. भारतातून परत जाताना बकहॅमनं अनेक नवी नाती निर्माण केली आणि त्याच्या सुंदर आठवणी घेऊन तो मायदेशी निघाला.

हेही वाचा -

  1. डेव्हिड बेकहॅमसोबतच्या फोटोवरुन खिल्ली उडवणाऱ्या हर्षवर्धन कपूरनं दिलं शांत उत्तर

2. दीपिका पदुकोण रणवीर सिंग युरोप दौऱ्यावरुन मुंबईला परतले, रणबीर कपूरही झाला स्पॉट

3. चौथ्यांदा मिळणार का भारतीय सुंदरीला 'मिस युनिव्हर्स'चा क्राऊन, स्पर्धेचा तपशील जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.