मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमुळे तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. सोनाक्षी सिन्हाच्या 'दहाड' या वेब सीरिजला स्ट्रीमिंग पदार्पणासाठी खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, या वेब सीरिजची कहाणी अशी आहे की, अंजली भाटी ही व्यक्तीरेखा खालच्या जातीतून येते आणि तिला लहानपणापासून भेदभावाचा सामना करावा लागतो. ही कहाणी फार प्रेरीत करणारी आहे. या वेब सीरिजबद्दल सोनाक्षीने म्हटले, 'माझा आवडता सीन तो आहे जिथे आपण आनंदच्या वडिलांच्या घरी छापा टाकायला जातो आणि तो अंजलीला आत येऊ देत नाही कारण तो म्हणतो की ती खालच्या जातीची आहे, तो असे करू देणार नाही. ज्या प्रकारे तो सीन लिहिण्यात आला आहे, हा संवाद फार मनाला भिडणारा आहे. ते खरोखरच हादरून देणारे होते. एक अभिनेत्री म्हणून मला त्या ओळी बोलता येणे आणि स्वतःसाठी उभे राहणे खरोखरच सशक्त होते.'
दहाड वेब सीरिज : ती पुढे म्हणाली, 'मला हे डायलॉग बोलताना ताकद जाणवत होती. ज्यात म्हटले होते की हा पूर्वजांचा वेळ नाही, कायदा-कानून आणि संविधानाचा वेळ आहे. कायद्यानुसार आणि संविधानानुसार गोष्टींचा न्याय आणि निर्णय घेतला जातो. आणि एक पोलीस म्हणून मला तुमच्या घरात जाण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. आणि जर तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस करेल. त्यामुळे मला असे वाटते की ते खरोखरच खूप शक्तिशाली शब्द लिहिले होते आणि लेखकांनी एक विलक्षण काम केले आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी, ते सादर करणे अत्यंत खास होते.'
सोनाक्षी हटके अंदाज : रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय दिग्दर्शित, दहाडची निर्मिती एक्सेल मीडिया एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी यांनी केली आहे. ही मालिका प्राइम व्हिडिओ आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सोनाक्षी आणि विजय वर्माची दहाड ही वेब सीरिज १२ मे रोजी प्रदर्शित झाली होती. आता ही वेब सीरिज फार जास्त प्रमाणात बघितली जात आहे. सोनाक्षीचा नवा हटके अंदाज हा प्रेक्षकांना फार पसंतीला पडला आहे, यासाठी तिचे फार प्रेक्षकांसह मनोरंजनविश्वातूनही कौतुक होत आहे.
हेही वाचा :
- Priyanka chopra reaction : प्रियांका चोप्राने पती निक जोनासच्या 'द गुड हाफ' या चित्रपटावर दिली प्रतिक्रिया
- Firing On Folk Singer : प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका निशा उपाध्यायवर गोळीबार; माथेफिरुने स्टेजवरच गोळी झाडल्याने गायिका गंभीर
- Yeh Jawaani Hai Deewani Movie : 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण