ETV Bharat / entertainment

relief to Marathi film industry : मराठी चित्रपट उद्योगासाठी करमुक्तीसह, अनेक सवलती देण्याची सांस्कृतिक मंत्र्याची घोषणा

author img

By

Published : May 10, 2023, 5:24 PM IST

अडचणीत असलेल्या मराठी चित्रपट उद्योगाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा तयारीत आहे. मराठी चित्रपटांना एसजीएसटीमधून तीन ते पाच वर्षांसाठी सूट देता येईल का? याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Etv Bharat
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई - राज्यातील मराठी चित्रपट उद्योगाला अधिकाधिक चालना मिळावी यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत आता प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात येते. मात्र, तरीही मराठी चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षक वर्ग मिळावा, मराठी तरुणांनी चित्रपट क्षेत्रात यावे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने काही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मराठी चित्रपट उद्योगासाठी सवलती देण्याची सांस्कृतिक मंत्र्याची घोषणा

एस जी एस टी मधून सूट - राज्यातील चित्रपट उद्योगाला गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे कोरोनामुळे उद्योगात अनेक संकटे येत गेली. मात्र, मराठी उद्योगाला आता तारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असून मराठी चित्रपटांना केंद्र सरकारच्या आखत्यारीतील सीजीएसटी करातून सूट मिळणार नाही मात्र येत्या तीन ते पाच वर्षांसाठी एसजीएसटी या राज्य सरकारच्या घरातून सूट देता येईल का ? याबाबत विचार सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबत काही सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता, असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

कलाकारांसाठी पोर्टलची निर्मिती - राज्यातील चित्रपट कलावंतांना तसेच अन्य कलावंतांना आपली कला लोकांपर्यंत सादर करता यावी तसेच जनतेला ही या कलाकारांपर्यंत पोहोचता यावं, अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करता यावेत, यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत अमेझॉनच्या धरतीवर आता मराठी कलावंतांचे पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

चित्रपटांना चित्रीकरणासाठी शुल्क नाही - मराठी चित्रपट क्षेत्रात जास्तीत जास्त चित्रपट निर्मिती व्हावी यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून आता स्टुडिओमध्ये होणाऱ्या चित्रपटांच्या चित्रीकरणाशिवाय स्टुडिओच्या बाहेर जर चित्रीकरण करण्यात येणार असेल तर त्या चित्रीकरणाला कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. राज्य सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तसेच चित्रपट उद्योगाच्या भरभराटीसाठी महेश कोठारे प्रसाद ओक यासारख्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांचा समावेश असलेली एक समितीही राज्य सरकारने नेमली आहे.

थोर व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट - महाराष्ट्रामध्ये अनेक थोर व्यक्ती जन्माला आल्या, अनेक संत जन्माला आले मात्र त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख अजूनही समाजाला पुरेशी झालेली नाही. त्यामुळे राज्यातील थोर आणि महनीय व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण आणि अन्य बाबींबाबतही काही विशिष्ट थीम घेऊन चित्रपट निर्मिती व्हावी यासाठी ही सरकार चालना देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा - The Kerala Story : मालवणी परिसरात राहणाऱ्या महिलांना 'द केरळ स्टोरी'ची मेजवानी, चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.