ETV Bharat / entertainment

पक्कं ठरलं! शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये विजय सेतुपती साकारणार खतरनाक व्हिलन!! - शाहरुखचा खलनायक

जवान या चित्रपटात शाहरुख खानशी दोन हात करण्यासाठी साऊथचा दमदार अभिनेता विजय सेतुपती खलनायक म्हणून एन्ट्री करणार आहे. त्यामुळे चित्रपटाला विजयच्या रुपाने एक खतरनाक व्हिलन मिळाला आहे.

Etv Bविजय सेतुपती आणि शाहरुख खानharat
Etv विजय सेतुपती आणि शाहरुख खानBharat
author img

By

Published : Aug 3, 2022, 3:13 PM IST

Updated : Aug 3, 2022, 8:50 PM IST

हैदराबाद - शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडियानुसार, 'जवान' चित्रपटात शाहरुख खानशी दोन हात करण्यासाठी खलनायकाच्या भूमिकेत दमदार अभिनेता विजय सेतुपतीची एन्ट्री झाली असल्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे विजय या महिन्याच्या अखेरीस चेन्नईमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट एका दमदार खलनायकाच्या शोधात असल्याची चर्चा पूर्वीपासून होती आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ ​​ऍटली यांचा हा शोध विजयच्या नावावर संपला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भूमिकेसाठी विजय सेतुपतीचे नाव पुढे येत असल्याची चर्चा होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानसमोर आता विक्रम-वेधा स्टार विजय झगडताना दिसणार आहे. विजय पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत काम करणार आहे.

शाहरुख खानही विजयसोबत काम करण्यास उत्सुक होता आणि त्यानेही विजयच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. 9 जून रोजी झालेल्या जवान चित्रपटाची लीड अभिनेत्री नयनताराच्या लग्नात शाहरुख, चित्रपट दिग्दर्शक ऍटली आणि विजय सेतुपती देखील दिसले होते.

विजय सध्या कॅटरिना कैफसोबत मेरी ख्रिसमस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू असून कॅटरिना कैफनेही सेटवरील अनेक फोटो शेअर केले आहेत. विजय शेवटचा कमल हासनच्या विक्रम या चित्रपटात दिसला होता.

हेही वाचा - सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला 'आयोध्येचा राजा'

Last Updated : Aug 3, 2022, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.