ETV Bharat / entertainment

Rajesh Roshan Birthday : चार दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणारे संगीतकार राजेश रोशन - Rajesh Roshan

संगीतकार राजेश रोशन २४ मे रोजी आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेली चार दशके त्यांनी संगीताची सेवा केली आहे. ह्रतिक रोशन सुपरस्टार होण्यात त्यांच्या संगीताचा महत्त्वाचा वाटा आहे.

Rajesh Roshan Birthday
संगीतकार राजेश रोशन
author img

By

Published : May 24, 2023, 3:12 PM IST

मुंबई - गेली ४ दशके संगीत क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ संगीतकार राजेश रोशन यांचा २४ मे रोजी वाढदिवस आहे. आजवर त्यांनी भारतीय संगीत व चित्रपटसृष्टीला भरीव योगदान केले आहे. सव्वाशेहून अधिक हिंदी चित्रपटांना त्यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत बहाल केले आहे. त्यांच्या गाण्यांनी तमाम सुपरस्टारच्या लोकप्रियतेत भर पडली. राजेश रोशन यांनी हजारो गाण्यांची रचना केली आणि सुरेल संगीताची पर्वणी दिली आहे.

राजेश रोशन यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. त्यंचे वडिल संगीतकार रोशन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार होते. वडिलांसोबत संगीताचे धडे गिरवणाऱ्या राजेश यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७४ मध्ये कुँवारा बाप या चित्रपटासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी खूप गाजली. सज रही गली मेरी माँ हे मोहमद रफी आणि मेहबूब यांनी गायलेले गाणे तुफान हिट झाले. या चित्रपटासाठी इतर गाणी लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी गायली होती. कुँवारा बापमधील चारही गाणी सुपरहिट ठरली आणि संगीतकार म्हणून राजेश रोशन यांच्या कारकिर्दीला यशस्वी सुरुवात झाली.

१९७५ मध्ये जुली या चित्रपटाची निर्मीती बी. नागिरेड्डी यांनी केली. या चित्रपटाचे संगीत त्याकाळातले सर्वात हिट ठरले. लता मंगेशकर, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी स्वरसाज दिलेल्या राजेश रोशन यांच्या गाण्यांनी लेकांना वेड लावले. त्यावर्षीचा सर्वेत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार राजेश रोशन यांना मिळाला. त्यानंतर त्यांच्याकेड चित्रपटांची संगीतासाठी रांगच लागली. नंतरच्या काळात वर्षातून किमान अर्धा डझन चित्रपटांसाठी त्यांचे संगीत असायचे. त्यांच्या करियरमध्ये त्यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाली आहे आणि दोन वेळा ते विजेते आहेत.

सत्तरच्या दशकात करियरला सुरुवात केलेले राजेश रोशन काळानुरुप स्वतःला बदलत गेले. प्रत्येक पिढीतील तरुणाईला कोणते संगीत आवडते याचे भान त्यांनी सातत्याने जपले आहे. कहो ना प्यार है या चित्रपटातील गाण्यांनी तर अजूनही प्रेक्षकांना वेड लावले आहे. राजेश रोशन यांची बंधू आणि ख्यातनाम दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या चित्रपटांना त्यांचेच संगीत असते. त्यांचा पुतण्या ह्रत्विक रोशन सुपरस्टार होण्यात राजेश रोशन यांच्या गाण्यांचाही सिंहाचा वाटा आहे.

राजेश रोशन आणि कांचन रोशन या दांपत्याला ईशान रोशन आणि पश्मिना रोशन ही मुले आहेत. पश्मिना रोशनला अभिनयाची आवड असून ती आता इश्क विश्क रिबाउंड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. निपुण धर्माधिकारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकिय पदार्पण करणार असून यात सुरेश सराफ, नायला ग्रेवाल आणि जिब्रान खान पश्मिनाचे सहकलाकार असतील. राजेश रोशन यांचा मुलगा ईशान रोशन याला मात्र राकेश रोशन यांच्या प्रमाणेच दिग्दर्शक होण्याची इच्छा आहे.

हेही वाचा - Nitesh Pandey Dies Of Heart Attack : अनुपम फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.