मुंबई - Actress vaishnavi dhanraj : 'सीआयडी' (CID ) फेम अभिनेत्री वैष्णवी धनराजनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिची व्यथा मांडली आहे. तिनं कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैष्णवीनं व्हिडिओ शेअर करून दुखापतीच्या खुणाही दाखवल्या आहेत. वैष्णवी धनराजनं या व्हिडिओद्वारे मदत मागितली आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. याशिवाय ती घरच्यांनी मारहाण केल्याचं सांगत आहे. वैष्णवी ही 'सीआयडी'सारख्या अनेक मोठ्या टीव्ही शोचा भाग आहे. तिनं 'तेरे इश्क में घायल' आणि 'बेपनाह' सारख्या शोमध्ये काम केलं आहे.
-
Called Kashmira Police station, had a word with Hawaldar Santosh Joshi.
— K Himaanshu Shuklaa (@khimaanshu) December 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Please help @MumbaiPolice
">Called Kashmira Police station, had a word with Hawaldar Santosh Joshi.
— K Himaanshu Shuklaa (@khimaanshu) December 15, 2023
Please help @MumbaiPoliceCalled Kashmira Police station, had a word with Hawaldar Santosh Joshi.
— K Himaanshu Shuklaa (@khimaanshu) December 15, 2023
Please help @MumbaiPolice
वैष्णवी धनराजचा व्हिडिओ व्हायरल : हिमांशू शुक्ला नावाच्या ट्विटर अकाउंटवरून वैष्णवी धनराजचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये वैष्णवी धनराजनं म्हटलं, ''मी वैष्णवी धनराज आणि मला हिमांशू शुक्लाची मदत पाहिजे आहे. मी मुंबईतील काशीमिरा पोलीस ठाण्यात आहे. मला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली आहे. मला मीडिया आणि सध्या सर्वांची मदत पाहिजे आहे''. तिचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करुन तिला मदत करण्याचं आवाहन करत आहेत. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिचा फोन घेऊ ठेवल्याचंही या पोस्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
घरगुती हिंसाचार : याआधीही वैष्णवी धनराज शारीरिक अत्याचाराला बळी पडली आहे. तिला तिच्या वैवाहिक आयुष्यात घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. वैष्णवी धनराजनं 2016 मध्ये अभिनेता नितीन शेरावतसोबत लग्न केलं. एका मुलाखतीत, तिनं खुलासा केला होता की, ती घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती आणि त्यामुळे तिचा घटस्फोट झाला होता. याशिवाय तिचा पती रक्तस्त्राव होईपर्यंत तिला मारहाण करत असल्याचा तिनं खुलासा केला होता. वैष्णवी धनराजनं याआधी म्हटलं होतं की, 'माझा तो जीव घेणार होता. मी इतकी घाबरले की मी घरातून पळून गेले. त्यानं मला एवढी मारहाण केली की माझ्या पायात रक्तस्त्राव झाला. भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तो माझा शेवटचा दिवस होता, असं वाटलं. शेवटी मला घटस्फोट मिळाला."
हेही वाचा :