ETV Bharat / entertainment

chandramukhi 2 trailer released : कंगना रणौतच्या आगामी 'चंद्रमुखी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज... - कंगना दिसणार नर्तकीच्या भूमिकेत

chandramukhi 2 trailer released : कंगना रणौतच्या आगामी 'चंद्रमुखी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खूप जबरदस्त असून या चित्रपटामधील कलाकरांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहेत.

chandramukhi 2 trailer released
चंद्रमुखी 2चा ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 6:09 PM IST

मुंबई - Chandramukhi 2 Trailer : कंगना रणौत सध्या तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आहे. 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी वासू यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे कंगना रणौतने साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. 'चंद्रमुखी 2'मध्ये राघव लॉरेन्स हा कंगना रणौतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान आता 'चंद्रमुखी 2'बाबत एक बातमी समोर आली आहे. 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर झाला रिलीज : 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर हा 2 मिनिट 48 सेंकदाचा आहे. या ट्रेलरने आता चाहत्यांमध्ये उत्सूकता वाढवली आहे. 'चंद्रमुखी 2'च्या ट्रेलरमध्ये राघव लॉरेन्स हा राजाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय कंगना नृत्य सादर करताना दिसत आहे. त्यानंतर अचानक ट्रेलरमध्ये भयानक दृष्य दाखवली गेली आहेत. या ट्रेलरमध्ये कंगानला खूप सुंदर दाखविल्या गेले आहे. याशिवाय तिचे भयानक रूप देखील ट्रेलरमध्ये पाहयला मिळत आहे. तसेच या चित्रपटामध्ये महिमा नंबियार , लक्ष्मी मेनन, रवी मारिया, राव रमेश, वडिवेलू, श्रुष्टि डांगे हे कलाकर दिसणार आहेत.

कंगना दिसणार नर्तकीच्या भूमिकेत : कंगना रणौतने ट्विटरवर 'चंद्रमुखी 2'मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. कंगनाने यापूर्वी 'चंद्रमुखी 2' ट्रेलर लॉन्च होण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली होती. कंगनाच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला हिट असल्याचे म्हटले आहे. 'चंद्रमुखी 2'मध्ये, कंगना राजाच्या दरबारात नर्तकीच्या भूमिकेत दिसणार आहे. लायका प्रॉडक्शन आणि सुबास्करन निर्मित हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'चंद्रमुखी 2' हा ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी'चा सीक्वल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. हा चित्रपट रूपेरी पडद्यावर हिट ठरला होता.

हेही वाचा :

  1. Jawan advance booking: शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटना प्रदर्शित होण्यापूर्वीच केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या आकडेवारी
  2. Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan: 'गदर 2'च्या पार्टीत कार्तिकनं एक्स गर्लफ्रेंड साराला मारली मिठी , व्हिडिओ व्हायरल
  3. Gadar २ VS OMG २ box office day २४ : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'; कोणाचे किती कलेक्शन? घ्या जाणून...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.