ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'मधील भूमिकेला न्याय देण्यासाठी बॉबी देओलनं केली जिममध्ये मेहनत - जिममध्ये केली मेहनत

Bobby Deol in Animal : बॉबी देओल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. त्यानं 'अ‍ॅनिमल'मधील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेसाठी जिममध्ये खूप कसरत केली आहे.

Bobby Deol in Anima
बॉबी देओल अ‍ॅनिमलमध्ये
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 4:44 PM IST

मुंबई - Bobby Deol in Animal : बॉबी देओलनं 'धरम वीर' या चित्रपटाद्वारे वयाच्या दहाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर तो 1995 मध्ये 'बरसात' या चित्रपटामध्ये ट्विंकल खन्नासोबत दिसला. हा चित्रपट राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला होता. बॉबी देओलची वाऱ्यावर फिरणारी कर्लिंग हेअरस्टाईल आणि लेदर फर जॅकेटवरचं त्यांच लूक सर्वाचं आठवत असेल. 'सोल्जर' या चित्रपटामुळं त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. त्यानंतर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्याला पाहिजे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही.

'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये दिसेल खलनायकाच्या भूमिकेत : दरम्यान 2020 मध्ये, बॉबी देओलनं आश्रम या वेब सीरीजद्वारे जबरदस्त पुनरागमन केलं. आता 54 वर्षांचा बॉबी देओल आगामी 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात आपल्या डॅशिंग लूकसह खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'अ‍ॅनिमल'मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यानं जिममध्ये खूप मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे बॉबी देओलच्या लूकमुळे 'अ‍ॅनिमल' डायरेक्टर संदीप रेड्डी वंगा यांनी त्याला चित्रपटात खलनायकाची भूमिका ऑफर केली होती. संदीप यांनी सांगितलं की, ते 'अ‍ॅनिमल'साठी अशाच स्टाईलच्या शोधात होते.

बॉबी देओल रणबीर कपूरवर भारी : 'अ‍ॅनिमल'मध्ये रोल ऑफर होताच बॉबीनं त्याच्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केली. त्यानं ट्रेनरसोबत जिममध्ये खूप मेहनत घेतली. बॉबीनं अनेकदा त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जिममधील काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरला जास्त स्क्रीन टाईम मिळाला आहे. पण ट्रेलरच्या शेवटी बॉबीला जेमतेम दोन ते तीन शॉट्स मिळाले आहेत, याद्वारे त्यानं हे सिद्ध केले आहे की, तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाव्यतिरिक्त तो साऊथचा सुपरस्टार सुर्याच्या 'कंगुवा' चित्रपटात दिसेल. याशिवाय तो पवन कल्याण स्टारर 'हरी हरा वीरा मल्लू' या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. विधू विनोद चोप्रांचा 'ट्वेल्थ फेल' ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत
  2. 'फायटर' चित्रपटाचा टीझर होणार 'या' तारखेला रिलीज
  3. बिग बॉस 17मध्ये आला अंकिता लोखंडेच्या गर्भधारणेचा टेस्ट रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.