मुंबई - गेली ५० वर्षे देशभरातील चाहत्यांना आपल्या अभिनयाने आणि अभिजात सौंदर्याने मोहिनी घालणारी अभिनेत्री रेखा हिचा आज वाढदिवस आहे. १० ऑक्टोंबर १९५४ रोजी तामिळनाडूतील चेन्नईमध्ये जन्मलेल्या रेखाला हिंदीचा कोणताही लवलेश नसताना ती हिंदी सिनेमाची तीन दशके आघाडीची अभिनेत्री म्हणून वावरली. तिचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्य त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
रेखा ही सुप्रसिद्ध अभिनेता जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे. तिची आई पुष्पावल्ली यादेखील तेलुगू अभिनेत्री होत्या. त्यामुळे रेखा हिला बालपणीच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. १९६६ साली तिने आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, रिल लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही तिला अनेक धक्के पचवावे लागले.
![सावन भादो चित्रपटात रेखा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/sawanbhado_1010newsroom_1665374257_934.jpg)
आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना तिने पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये काही बी ग्रेड चित्रपटांचाही समावेश आहे. 'सावन भादो' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तिचा 'प्राण जाये पर वचन न जाये' हा चित्रपट देखील चर्चेत आला होता. या चित्रपटात तिचा बोल्ड सीन फारच गाजला होता. त्याकाळी बोल्ड सीन्सची मोठी चर्चा होत होती. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
![खून भरी मांगमध्ये रेखा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/khoon-bhari-maang_1010newsroom_1665374257_1027.jpg)
रेखाची सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे अगदी कमी वयात तिने चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केली होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिने तमिळ भाषेतील काही बी ग्रेड चित्रपटात भूमिका साकारल्या. बॉलिवूडमध्ये तिने 'कामसुत्र' सारख्या इरॉटिक चित्रपटांमध्येही भूमिका केली आहे. एका चित्रपटामध्ये त्या लैंगिक शोषणालाही बळी पडल्या होत्या. तिच्या 'अंजाना सफर' या चित्रपटामध्ये एका रोमॅन्टिक गाण्याच्या सीनबद्दल तिला काहीही सांगण्यात आलं नव्हतं. मात्र, रेखा सेटवर आल्यानंतर दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटल्यावर यातील मुख्य नायक विश्वजीत यांनी तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. सुरुवातील रेखा हिला आपल्यासोबत काय घडत आहे, हे समजलेच नाही. मात्र, जेव्हा तिला या सीनबद्दल समजले, तेव्हा ती सेटवरच रडायला लागली होती.
![उत्सव चित्रपटात रेखा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/utsav_1010newsroom_1665374257_390.jpg)
रेखा हिच्यावर लिहण्यात आलेल्या 'रेखा - द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. पहिल्याच चित्रपटात बोल्ड सिनमुळे रडणाऱ्या रेखा हिने पुढे मात्र, बऱ्याच चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारली होती.
रेखा हिने वयाची सत्तरी ओलांडली असली, तरी आजही ती इतर अभिनेत्रींना लाजवतील इतक्या फिट आणि सुंदर आहे. तिच्या एनर्जी आणि सौंदर्याची चर्चा नेहमीच कलाविश्वात पाहायला मिळते. विविध पुरस्कार सोहळ्यातही ती आपल्या सौंदर्यांने सर्वांचं लक्ष वेधुन घेत अलते. रेखाला दीर्घायुष्य लाभावे ही ईटीव्ही भारत परिवाराकडून हार्दिक सदिच्छा!!
हेही वाचा - नवविवाहित नयनतारा झाली जुळ्या मुलांची आई, विग्नेशने दिली गोड बातमी