ETV Bharat / entertainment

Aishwarya Rai Birthday special: 'देवदास'पासून 'PS-I' पर्यंत, ऐश्वर्या रायच्या काही सर्वोत्तम कामगिरीवर एक नजर - Aishwarya Rai 50 th Birthday

सौंदर्य आणि प्रतिभेचं अनोखं प्रतिक असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायनं अनेक प्रसंगी तिच्या ग्लॅमरस लूक आणि अप्रतिम अभिनय कौशल्यानं तिच्या चाहत्यांची मनं जिंकलेत. 'इरुवर' या मणिरत्नम दिग्दर्शित केलेल्या चित्रपटापासून सुरू झालेली तिची अभिनय कारकिर्द त्यांच्याच पोन्नीयन सेल्वनपर्यंत पोहोचली आहे. तिच्या वाट्याला अनेक भूमिका आपल्या आणि तिनं आपल्या अभिनय सामर्थ्यांनं त्या साकारल्या. यातील काही महत्त्वाच्या उत्तम चित्रपटावर एक नजर टाकूयात.

ऐश्वर्या राय वाढदिवस विशेष
Aishwarya Rai Birthday special
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 12:48 PM IST

मुंबई - सौंदर्य आणि अभिनय प्रतिभाचा संगम असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या ऐश्वर्यानं दाक्षिणात्य प्रतिभावान दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'इरुवर' या राजकीय नाट्य असलेल्या चित्रपटातून 1997 मध्ये तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्याच वर्षी तिचा 'और प्यार हो गया' हा पहिला हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यानंतर तिनं कधीच माग वळून पाहिलं नाही. एकाहून एक चित्रपटातून ती आपल्या अभिजात सौंदर्यांच, अभिनय प्रतिभेचं प्रदर्शन करत राहिली. तिने 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'मोहब्बतें', 'धूम 2' यासारख्या लोकप्रिय चित्रपटातून ती गेल्या दोन दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्य तिच्या कारकिर्दीवर एक ओझरती नजर टाकूयात.

इरुवर (1997)

Aishwarya Rai Birthday special
ऐश्वर्या राय वाढदिवस विशेष

'इरुवर' हा दिग्दर्शक मणिरत्नम यांचा अर्ध-चरित्रात्मक तमिळ राजकीय विषयावरील नाट्यमय चित्रपट होता. खूप कमी कलाकार असे असतात ज्यांना पहिल्याच चित्रपटात दुहेरी भूमिका करण्याची संधी मिळते. याला अपवाद होती ऐश्वर्या राय बच्चन. तिनं पहिल्याच चित्रपटात पुष्पवल्ली आणि कल्पना या दुहेरी भूमिका अनुभवी नाजूकपणाने साकारल्या.

देवदास (२००२)

Aishwarya Rai Birthday special
ऐश्वर्या राय वाढदिवस विशेष

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' हा भारतीय चित्रपटांच्या यादीत एक क्लासिक चित्रपट मानला जातो. शरतचन्द्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या देवदास या कादंबरीवर आधारित भारतात अनेक चित्रपट बनले. पण भन्साळींनी पडद्यावर सादर केलेलं कथानक भव्य आणि नेत्रदीपक होतं. यामध्ये शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यासारखी तगडी स्टारकास्ट होती. यामध्ये ऐश्वर्यानं साकारलेली पारो ही व्यक्तीरेखा संस्मरणीय ठरली. यासाठी ऐश्वर्याला 48 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हम दिल दे चुके सनम (1999)

Aishwarya Rai Birthday special
ऐश्वर्या राय वाढदिवस विशेष

या चित्रपटात ऐश्वर्या रायनं उत्साही आणि मिश्कील विनोदी असलेल्या नंदिनी या तरुण मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला तीन वेगवेगळ्या छटा होत्या. सलमानने साकारलेल्या समीरबद्दल असलेलं समर्पित प्रेम, अजय देवगणनं साकारलेल्या वनराजबद्दलची उदासिनता आणि त्यांच्यासाठी शेवटी झालेला पश्चात्ताप सादर करताना ही भूमिका तिनं लीलया पेलली होती. नंदिनीची व्यक्तीरेखा ऐश्वर्यानं तिचा करिश्मा आणि परिपक्वता या दोहोंनी भरून काढली.

गुरु (२००७)

Aishwarya Rai Birthday special
ऐश्वर्या राय वाढदिवस विशेष

ममिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या गुरू या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. यामध्ये तिनं अभिषेक बच्चननं साकारलेल्या गुरूच्या पत्नीची भूमिका साकारली होती. मनानं मजबूत असलेल्या, पितृसत्ताक हुकूमांना नकार देणाऱ्या एका कठोर स्त्रीची भूमिका तिनं आव्हानात्मक पद्धतीनं साकारली. या भूमिकेसाठी तिच्या अभिनयाचा कस लागल्याचं पाहायला मिळालं होतं.

पोन्नियिन सेल्वन: I (२०२२)

Aishwarya Rai Birthday special
ऐश्वर्या राय वाढदिवस विशेष

या चित्रपटात ऐश्वर्या रायनं साकारलेली भूमिका आणि त्यातील तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी अस्त्र सोडलं. चोल वंशातील कल्कीच्या महाकाव्याची गाथा असलेल्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे दोन भागात प्रदर्शन झालं. या चित्रपटात तिनं दुहेरी भूमिका साकारली होती. चोल घराण्याच्या प्रतिष्ठित सिंहासनासाठीच्या सत्ता संघर्षावर आधारित या चित्रपटात ऐश्वर्यानं नंदिनी ही भूमिका साकारली आहे, जी कोणत्याही पराक्रमी राजांपेक्षा कितीतरी अधिक हुशार आणि गणनाक्षम आहे आणि तिला तिचे सौंदर्य तिच्या फायद्यासाठी कसं वापरायचं हे माहित आहे.

ऐश्वर्या रायच्या नावावर हिट चित्रपटांची मोठी यादी नसली तरी वरील चित्रपटांसह काही चित्रपटातून तिनं साकारलेल्या भूमिका उत्कृष्ठ होत्या. दिग्दर्शक मणिरत्नम यांची ती ऑलटाईम फेव्हरेट अभिनेत्री राहिली आहे. आज ऐश्वर्या राय 50 वा वाढदिवस साजरा करत असून तिच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा जलवा सिनेमातून आणि फॅशन शोमधून कायम दाखवत आली आहे. तिच्या आगामी कारकिर्दीसाठी यानिमित्तानं तिच्या भरपूर शुभेच्छा.

हेही वाचा -

1. Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा बिग बॉसच्या घरातील रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

2. Varun Lavanya Photos : साऊथ स्टार वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी आज अडकणार लग्नबेडीत

3. Sonnalli Seygall Pics : सोनाली सहगलनं शेअर केले इंस्टाग्रामवर हॉट फोटो ; पाहा पोस्ट....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.