मुंबई - बॉलिवूड कॉरिडॉरमधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर, बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आलिया भट्टनंतर आता बॉलिवूडची आणखी एक सुंदर अभिनेत्री बिपाशा बसू आई बनली आहे. अभिनेत्रीने शनिवारी (12 नोव्हेंबर) एका मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या घरात लग्नाच्या 6 वर्षांनंतर पाळणा हलणार आहे. 2016 मध्ये दोघांचे लग्न झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला असून या गुड न्यूजमुळे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण आहे. करण आणि बिपाशाने यावर्षी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती आणि तेव्हापासून चाहते त्यांच्या पहिल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते.
बिपाशाने पूर्ण काळजी घेतली - बिपाशाने तिच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान स्वतःची काळजी घेतली होती आणि वेळोवेळी तिच्या चाहत्यांसह व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करून तिची स्थिती सांगितली होती. त्याचबरोबर बिपाशा बसूही अनेक व्हिडिओंमध्ये मस्ती करताना दिसली. करण आणि बिपाशाने एकत्र अनेक मॅटर्निटी फोटोशूट देखील केले होते, ज्यामुळे बिपाशाला ट्रोल देखील व्हावे लागले होते.
2015 मध्ये 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेट झाली आणि पुढच्या वर्षी 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या 6 वर्षानंतर, या जोडप्याला मुलगी म्हणून पहिले अपत्य प्राप्त झाले.
फोटोशूटवर बिपाशा झाली ट्रोल- अलीकडेच बिपाशाने एक सुंदर मॅटर्निटी फोटोशूट शेअर केला होता, ज्यावर यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्याचवेळी आलिया भट्टनेही बिपाशाला काही मॅटर्निटी कॉस्च्युम्स पाठवले होते.
आलियानेही एका मुलीला जन्म दिला - 6 नोव्हेंबरला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील एका मुलीचे पालक झाले आहेत. अलीकडेच रणबीर आपली मुलगी आणि पत्नी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घेऊन गेला. मुलीच्या आगमनाने कपूर कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा - ''सलमान भाई बनला लांडगा'', वरुण धवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ