ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2 : अब्दू रोझिकचे चुंबन घेतल्यानंतर उर्फी जावेद मनीषा राणीवर भडकली... - सलमान खान

बिग बॉसचे माजी स्पर्धक अब्दू रोजिक यांनी घरात खास पाहुणे प्रवेश केला आहे. याशिवाय त्याने बिग बॉसच्या घरात टास्कमध्ये देखील सहभाग घेतला. या टास्क दरम्यान एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे उर्फी जावेद मनीषा राणीवर भडकली.

Bigg Boss OTT 2
बिग बॉस ओटीटी २
author img

By

Published : Jul 4, 2023, 2:54 PM IST

मुंबई: बॉलिवूड स्टार सलमान खानचा शो 'बिग बॉस ओटीटी २' आता फार जास्त चर्चेत आहे. अलीकडेच आकांक्षा पुरी आणि जैद हदीद यांच्या ३० सेकंदांच्या लिपलॉकने घरात खळबळ उडवून दिली आहे. घरात असे कृत्य केल्याबद्दल सलमानला राग आला होता. त्यामुळे आकांक्षा पुरीला घरातून बाहेर काढण्यात आले. इकडे या आठवड्यात जैदच्या डोक्यावरही निर्मूलनाची टांगती तलवार उभी आहे. आता घरात आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या शोमध्ये कमीतकमी कपडे परिधान करणारी उर्फी जावेदने मनीषा राणीला निशाण्यावर धरले आहे. 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये उपस्थित स्पर्धकांवर कमेंट केल्यामुळे उर्फी सध्याला चर्चेत येत आहे.

Bigg Boss OTT 2
Bigg Boss OTT 2

अब्दू रोजिकची शोमध्ये एंट्री? : बिग बॉसचे माजी स्पर्धक अब्दू रोजिक यांनी घरात खास पाहुणे म्हणून एंन्ट्री घेतली आणि त्यांनी एका टास्कमध्ये देखील सहभाग घेतला. अब्दू रोजिकची शोमध्ये एंट्री झाल्यानंतर मनीषा राणी अधिकच उत्साहित झाली आहे आणि तिने घरात अब्दूला 'जबरदस्तीने किस' केले. यावर उर्फी जावेद संतापली. मनीषाने एका टास्कदरम्यान हे कृत्य केले, ज्यावर सोशल मीडियावरही लोक तिच्यावर भडकले आहे. या चुंबन दृश्याचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने लिहिले आहे की, 'हे पाहणे खूप अस्वस्थ करणारे आहे, ती जबरदस्तीने त्याचे चुंबन का घेतेय, तो छोटा मुलगा नाही, मर्यादेत राहा'. असे लिहले आहे.

उमेदवारीची टांगती तलवार कोणावर? : घरातील ७ सदस्यांवर नामांकनाची टांगती तलवार आहे. यामध्ये बाबिका ध्रुवे, जिया शंकर आणि मनीषा राणी यांना नॉमिनेट केल्या गेले आहे. घरातील स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट केले आहे. याशिवाय त्यांनी याबद्दल कारण देखील सांगितले आहे.

मनीषा राणी आणि जिया शंकर यांची लढत : बिग बॉसच्या घरात मनीषा राणी आणि जिया शंकर यांची झुंज देखील पाहायला मिळाली आहे. जिया शंकर आणि फलक नॉमिनेट झाल्यावर मनीषा राणी भडकली आणि त्यानंतर खाण्याच्या आणि पिण्याच्या गोष्टीवरून भांडणे यावेळी झाली. याशिवाय तिच्यावर बाबू - जानू खेळ खेळत असल्याचे आरोप देखील करण्यात आले.

हेही वाचा :

  1. MR AND MRS MAHI : जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अँड मिस्टर माही' २०२४ला होणार प्रदर्शित
  2. SatyaPrem Ki Katha News : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईची बॉक्स ऑफिसवर घसरण...
  3. Tarantino on Kill Bill 3 : माया हॉकसह किल बील ३ बनण्याची शक्यता क्वेंटिन टॅरँटिनोने फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.