ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2 day 38 highlights: धमाकेदार वीकेंडच्या वॉर नंतर सोमवारी 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये अनपेक्षित घडले.... - मनीषा राणीने माफी मागितली

'बिग बॉस ओटीटी २' च्या ३८व्या भागात एल्विश यादवने आशिका भाटियाच्या कपड्यांवर टिप्पणी केली. तसेच बेबीका धुर्वे आणि मनीषा राणी यांच्यातील तीव्र भांडण या भागात झाले. बिग बॉसचा हा भाग खूप जास्त मनोरंजक असून या भागात काही अनपेक्षित गोष्टी घडल्या आहे.

Bigg Boss OTT
बिग बॉस ओटीटी २
author img

By

Published : Jul 25, 2023, 1:23 PM IST

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी २' शो प्रेक्षकांचा खूप पसंतीचा शो आहे. या शोमध्ये रोज मनोरंजक गोष्टी घडत असतात, सोमवारचा बिग बॉसचा ३८वा भाग हा खूप मनोरंजक होता. या भागात अनपेक्षित गोष्टी घडल्या, त्यामुळे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. धमाकेदार वीकेंडच्या वॉर नंतर सोमवारी 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये एंजेल आणि डेविल हे टाक्स घेण्यात आले होते. या टास्कमध्ये घरातील सदस्यांचे दोन विभाग करण्यात आले होते. या सगळ्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची आपसी भांडणेही समोर आली. तसेच बिग बॉसच्या घरात आत मनीषा राणीशी संबंधित एक क्षण सर्वांनाच भावूक करून गेला.

डेव्हिल्स विरूद्ध एंजल्स टास्क : बिग बॉसने डेव्हिल्स विरुद्ध एंजल्स टास्क घरात सुरू केले, ज्यामध्ये बिग बॉसने अभिषेकला टीम एंजल्सचे नेतृत्व करायला लावले आणि एल्विशला टीम डेव्हिलचे नेतृत्व करायला लावले. टास्क दरम्यान, टीम एंजेलला काही बंधने पाळावी लागली. एंजेल टीमला मोठ्याने बोलण्याची परवानगी या टास्कमध्ये नव्हती. तसेच त्यांना नेहमीच डेव्हिल टिम सदस्यांसोबत आदराने बोलवे लागेल याशिवाय त्यांना या टास्कमध्ये रडण्याची परवानगी नाही आणि साधे अन्न खाणे त्यांच्यासाठी आवश्यक राहणार असे या टास्कमध्ये सांगण्यात आले होते. बिग बॉसच्या डेव्हिल विरुद्ध एंजल्स या टास्कमध्ये अनपेक्षित घडले. यावेळी काही घरातील सदस्यांमध्ये भांडणे झाली तर याशिवाय यादरम्यान मनीषा आणि बबिकामध्ये जोरदार भांडणे झाली.

टीम डेव्हिलने टास्क जिंकला : बिग बॉसने पूजाला तिचा निर्णय स्पष्ट करण्याची विनंती केली. पूजाने बराच विचारविनिमय केल्यानंतर टीम डेव्हिलला विजेता घोषित केले कारण टीम एंजेलच्या मनीषाने एका मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते. या निर्णयावर अभिषेक खूप नाराज झाला.

मनीषा राणीने कॅमेऱ्यासमोर बबिकाच्या आई-वडिलांची माफी मागितली : मनीषा राणीने कॅमेऱ्यासमोर बबिकाच्या आई-वडिलांना अपशब्दाचा वापर केल्यामुळे माफी मागितली. मनीषाने कॅमेऱ्यासमोर सॉरी अंकल आंटी म्हणत रडत बेबीकाच्या आई-वडिलांची माफी मागितली. यावेळी मनिषा खूप भावूक झाली होती.

हेही वाचा :

  1. Shah Rukh Khan and salman khan : 'टायगर ३' मधील शाहरुखचा लूक, 'या दिवशी' होऊ शकतो प्रदर्शित !!
  2. PRABHAS KALKI 2898 AD : 'प्रोजेक्ट के' लांबणीवर, 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत 'मोठा' फेरफार
  3. Dhindhora Baje Re Song out : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामधील 'ढिंढोरा बाजे रे' गाणे रिलीज...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.