मुंबई - Bigg Boss 17 : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ: ए हिरो इज बॉर्न' हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी रिलीज प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. या चित्रपटामध्ये टायगर आणि क्रिती सेनॉन हे अॅक्शन मोडमध्ये दिसले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही क्रिती आणि टायगर 'गणपथ'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान आता हे दोघेही 'बिग बॉस 17'च्या सेटवर पोहोचले होते. यावेळी क्रिती आणि टायगर यांनी भाईजानसोबत खूप मस्ती केली.
'बिग बॉस 17' मध्ये 'गणपथ' चित्रपटाचं प्रमोशन : 'गणपथ'चं प्रमोशन करताना 'बिग बॉस 17'च्या सेटवर टायगर हा सलमान खान म्हणतो की बिग बॉसच्या घरामधील एक डेमो मिळू शकतो का? त्यावर भाईजान हा क्रितीला चहा बनवायला लावतो. त्यानंतर क्रिती ही चहा बनविण्याचं नाटक करते. सलमान तिला म्हणतो की तू हे काय करत आहेस. यावर ती म्हणते की, दिसत नाही तूला मी चहा बनवत आहे. हे दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये चालत असलेल्या भांडणांबद्दल मस्कारी करताना दिसतात. त्यानंतर शेवटी टायगर हा त्यांचा लोकप्रिय डॉयलॉग म्हणतो, 'छोटी बच्चे हो क्या?' यानंतर तिघेही खूप हसतात. 'बिग बॉस 17' हा शो खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे अनेकजण चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या सेटवर येत असतात.
'बिग बॉस 17'मध्ये सहभागी झाले हे कलाकार : 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सना रईस खान, जिग्ना वोरा , अनुराग डोभाल , मन्नारा चोप्रा, मुनावर फारुकी , खानजादी , ऐश्वर्या शर्मा असे काही कलाकार आहेत. हा शो जिंकण्यासाठी प्रत्येकजण मर्यादा ओलांडताना दिसत आहे. या शोमध्ये मागील एपिसोडमध्ये बाबू भैय्या उर्फ अनुराग डोभालनं एका टास्क दरम्यान सर्वांना पराभूत करून या आठवड्याचे बॉस मीटर जिंकले. अनुरागचे इंस्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा :
- kajol and DDLJ : 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 28 वर्षे पूर्ण, काजोलनं शेअर केली पोस्ट
- Tejas Special Screening: संरक्षण मंत्री आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी 'तेजस'चं स्पेशल स्क्रीनिंग
- Vivek Agnihotri announces Parva : महाभारतावर तीन चित्रपट बनवण्याचा विवेक अग्निहोत्रींचा निर्धार, 'पर्व' फ्रँचाइजीची केली घोषणा