ETV Bharat / entertainment

Mischievous stories of Big B : बिग बीचे मिश्कील किस्से, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बेल बॉटममध्ये शिरला उंदिर - स्वतःवरच एक प्रकारे अमिताभ हसले

सध्या अमिताभ यांनी शेअर केलेला एक फोटो खूप चर्चेत आहे. या फोटोत बच्चन यांनी जांभई दिली आहे आणि त्याचवेळी क्लिक झालेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. अमिताभ नेहमीच वेगवेगळे किस्से चाहत्यांसाठी शेअर करत असतात, त्यांच्या बेल बॉटममध्ये उंदिर शिरला होता त्याचा किस्साही त्यांनी काही दिवसापूर्वी शेअर केला होता.

Mischievous stories of Big B
Mischievous stories of Big B
author img

By

Published : Feb 17, 2023, 2:41 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभर आहेत. त्यांच्या चित्रपटावर प्रेम करणारे त्यांना सोशल मीडियावर नेहमी फॉलो करत असतात. अमिताभच्या प्रत्येक साध्या गोष्टींचे चाहत्यांना कौतुक असते. ते काय बोलतात, काय खातात इथंपासून ते सध्या कोणत्या चित्रपटात काम करतात, आगामी चित्रपट कोणते आहेत, यासारख्या गोष्टींची इत्यंभूत माहिती चाहत्यांकडे असते. अशा डाय हार्ट फॅन्सना अमिताभही नाराज करत नाहीत. त्यांच्यासाठी छोटे छोटे क्षण बच्चन शेअर करत असतात. सध्या अमिताभ यांनी शेअर केलेला एक फोटो खूप चर्चेत आहे. या फोटोत बच्चन यांनी जांभई दिली आहे आणि त्याच वेळी क्लिक झालेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे.

त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या सेटवरच्या या फोटोत त्यांनी लाल आणि निळ्या रंगाचा चेक शर्ट घातला असून खूप काम केल्यानंतर आलेला कंटाळा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला दिलेले कॅप्शन वाचून तुमची खात्री पटेल की ते किती थकले आहेत. त्यांनी लिहिलंय, 'जेव्हा तुम्ही शेवटी पहाटे ३ वाजता काम पूर्ण करता.' यावरुन लक्षात येते की या वयातही अमिताभ केवळ चित्रपटात काम करत नाहीत तर रात्री ते पहाटेपर्यंत जागे राहून आपल्यातील कलाकारही जागा ठेवतात.

आता हा फोटो शेअर करुन स्वतःवरच एक प्रकारे अमिताभ हसले आहेत. आपल्यातील उणीवा किंवा स्वतःची झालेली फजितीही सांगण्यास बच्चन कमी पडत नाहीत. अलिकडेच दो और दो पांच या चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर एक बेल बॉटमधील फोटो शेअर केला होता. त्यावेळी बेल बॉटम पॅन्ट वापरण्याची स्टाईल किंवा फॅशन होती. १९८० च्या दशाकाच्या सुरुवातील अनेक चित्रपटातील हिरो अशी बेल बॉटम पॅन्ट वापरत असत. अमिताभ यांनीही दो और दो पांचमध्ये बेलबॉटम वापरली होती. एकदा ते चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा थिएटरमध्ये गेले होते. त्यावेळी अमितााभ यांनी बेल बॉटमची पॅन्ट घातली होती. थिएटरमध्ये सिनेमा पाहाता असताना एक उंदिर आला आणि तो थेट त्यांच्या बेल बॉटममध्ये शिरला होता. हा किस्सा सांगण्यासाठी बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, '2+2 = 5 ची 43 वर्षे; दो और दो पांच.. काय मजा आली हा चित्रपट करताना.. बेल बॉटम्स आणि ऑल!!!.... अरे बेल बॉटम्स खूप आमंत्रण देणारे होते ते दिवस.. एका थिएटरमध्ये, एकदा चित्रपट पाहायला गेलो होतो आणि एक उंदीर माझ्या पॅंटवर चढला.. बेल बॉटमला धन्यवाद,' असे त्यांनी लिहिले.

अमिताभ अलीकडेच दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट 'उंचाई' मध्ये बोमन इराणी, अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत दिसले होते. अभिनेता प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत आगामी पॅन इंडिया 'प्रोजेक्ट के' चित्रपटात अमिताभ दिसणार आहेत. त्यांनी दीपिकासोबत 'द इंटर्न'चा रिमेकही केला होता.

हेही वाचा - Shehzada day 1 box office: कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 2 पेक्षा शेहजादाला कमी प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.