ETV Bharat / entertainment

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' OTT रिलीजसाठी सज्ज - झी५ वर झुंड

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'झुंड' 6 मे रोजी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 6 मे पासून केवळ ZEE5 वर प्रसारित होईल.

'झुंड' OTT रिलीजसाठी सज्ज
'झुंड' OTT रिलीजसाठी सज्ज
author img

By

Published : Apr 21, 2022, 4:14 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा 'झुंड' 6 मे रोजी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 'सैराट' फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. क्रिडा शिक्षक विजय बारसे हे स्लम सॉकरचा एक वास्तविक जीवनाचा नायक, फुटबॉल खेळण्याची कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या वंचित पार्श्वभूमीतील मुलांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम करणारे संस्थापक आहेत. या चित्रपटात अंकुश गेडाम, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू आणि इतर अनेक कलाकार आहेत आणि एका झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचे जीवन आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

तानाजी गलगुंडे, सायली पाटील, विक्की कादियन, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे या चित्रपटातील इतर कलाकारांसह बिग बी विजय बारसे यांच्या भूमिकेत आहेत. नायक त्याच्या जीवनानुभवाचा उपयोग स्वत:साठी आणि समाजासाठी सामाजिक अडथळे तोडण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी करतो. हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या OTT प्रीमियरबद्दल भाष्य करताना, दिग्दर्शक नागराज मंजुळे शेअर करतात, "'झुंड'मध्ये एक मजबूत कथा आहे जी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे! अमितजींनी मुलांसोबत अक्षरशः पात्रांमध्ये जीव ओतला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाल्यानंतर ZEE5 वर डिजिटल रिलीझसह लोकांना चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला मिळेल याचा आनंद आहे."

चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांचे मत आहे की "झुंडची कहाणी सीमा ओलांडते." ते म्हणतात, "देशभरात भरपूर टाळ्या आणि कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट ZEE5 वर डिजिटल प्रीमियर करण्यासाठी सज्ज आहे. झुंडला खूप उंचावर घेऊन जाणे ही खूप आनंदाची भावना आहे कारण या नागराज मंजुळेच्या मोठ्या टीमचे प्रेक्षक साक्षीदार होतील.

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, राज हिरेमठ, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा आणि मंजुळे निर्मित 'झुंड' हा चित्रपट 6 मे पासून केवळ ZEE5 वर प्रसारित होईल.

हेही वाचा - 'झुंड'ला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अमिताभने मानले प्रेक्षकांचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.