ETV Bharat / entertainment

आनंद एल. राय दिग्दर्शित 'रक्षा बंधन'च्या रिलीजसाठी भूमी पेडणेकर झालीय उतावीळ!! -

भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar ) पुन्हा एकदा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ( Akshay Kumar ) आगामी 'रक्षा बंधन' ( Raksha Bandhan ) या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख ठरली असून चित्रपट पाहण्याासठी भूमी खूपच उत्साही झाली आहे.

भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमार
भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमार
author img

By

Published : Jun 9, 2022, 10:18 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar ) पुन्हा एकदा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ( Akshay Kumar ) आगामी 'रक्षाबंधन' ( Raksha Bandhan ) या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ती खूप उत्सुक आहे. बुधवारी तिने तिच्या सोशल मीडियावर याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त केली आहे.

भूमी पेडणेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अक्षय कुमारला टॅग करीत एक गाणे टाकले. ज्यामध्ये तिने लिहिलंय, अक्षय कुमार सर, आता रक्षाबंधनची वाट पाहत आहे." लगेचच अक्षय कुमारने यावर प्रत्युत्तर देत म्हटले, "प्रतीक्षा लवकरच संपेल भूमी पेडणेकर. काही दिवसांनी भेटू...#रक्षाबंधन"

अक्षय कुमारचे प्रत्युत्तर
अक्षय कुमारचे प्रत्युत्तर

'टॉयलेट: एक प्रेम कथा' हा भूमीचा 2017 मध्ये अक्षयसोबतचा पहिला एकत्रित चित्रपट होता. भारतात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाला वाहिलेला हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता.

रक्षा बंधन पोस्टर
रक्षा बंधन पोस्टर

अक्षय आणि भूमी पडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला कॉमेडी-ड्रामा, 'रक्षा बंधन' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सुरुवातीला 5 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार होता, परंतु तो COVID-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला होता. अखेर त्याच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा चित्रपट आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केला आहे आणि झी स्टुडिओज, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा - प्रेग्नेंसीतही नकळत करत होती आयटम साँग, सोनाली बेंद्रेचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.