ETV Bharat / entertainment

Bholaa box office collection Day 1:अजय देवगणच्या अ‍ॅक्शन चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 10 कोटींची कमाई - अजय देवगणचे दिग्दर्शन असलेला चौथा चित्रपट

अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनीत भोला 30 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. संमिश्र प्रतिक्रियांसह या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुहेरी आकड्यांची कमाई केली आहे. भोलाचे बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दिवशीचे कलेक्शन जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

भोला बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1
भोला बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1
author img

By

Published : Mar 31, 2023, 12:50 PM IST

मुंबई - अजय देवगणने नव्याने दिग्दर्शित केलेला भोला हा चित्रपट रामनवमीच्या दिवशी 30 मार्च रोजी देशभर रिलीज झाला. यात तो मुख्य भूमिकाही साकारत आहे. हा चित्रपट अभिनेता कार्तीच्या तमिळ हिट कैथी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. भोला या चित्रपटाची कथा एका रात्रीत घडणारी आहे. जेलमधून शिक्षा संपवून आपल्या मुलीच्या भेटीसाठी चाललेल्या अजयला अनेक शत्रूंशी लढावे लागते. अजयच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी दुहेरी आकड्याने सुरुवात केली परंतु त्याच्या सुपरहिट चित्रपट दृष्यम 2 च्या पहिल्या दिवसाचा व्यवसाय पार करण्यापासून तो दूर आहे.

भोलाची दमदार सुरुवात मात्र आयपीएलचे आव्हान - भोला बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1 चे अहवाल आले आहेत आणि बॉक्स ऑफिस इंडियानुसार या चित्रपटाने 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसर्‍या इंडस्ट्री टॅकर Sacnilk नुसार, भोलाने मात्र पहिल्या दिवशी अंदाजे 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट विस्तारित वीकेंडचा आनंद लुटणार असताना, शुक्रवारपासून सुरू होणार्‍या IPL 2023 मुळे बॉक्स ऑफिसच्या आकड्यांना फटका बसू शकतो.

भोलाची माऊथ पब्लिसिटी सकारात्मक - भोलाने संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्या आहेत. परंतु पहिल्या दिवसाच्या शेवटी माऊथ पब्लिसिटी सकारात्मक असल्याचे म्हटले जाते. ते चित्रपटाच्या बाजूने काम करू शकते. शत्रुत्व, क्रूरता आणि मृत्यूला न जुमानणाऱ्या या नाट्यमय हिंदी रिमेक ज्या प्रकारे पडद्यावर मांडण्यात आलाय यावर समीक्षक खूश दिसत नाहीत. लोकांनी मात्र भोलाला 'पैसा वासूल' थ्रिलर म्हणून गौरवले आहे.

अजय देवगणचे दिग्दर्शन असलेला चौथा चित्रपट - भोला चित्रपटात अजय देवगण शिवाय त्याची अनेक चित्रपटातील सहकारी आणि मैत्रीण तब्बू ही कायद्याचे पालन करणारी, बंदूकधारी इन्स्पेक्टर डायनाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात दीपक डोबरियाल, विनीत कुमार, गजराज राव आणि संजय मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यू, मी और हम (2008), शिवाय (2016), आणि रनवे 34 (2022) नंतर हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे.

हेही वाचा - Im Db Breakout Star Award : फर्जी अभिनेता भुवन अरोरा याला मिळाला Im Db चा ब्रेकआउट स्टार पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.