ETV Bharat / entertainment

Bholaa box office: अजय देवगणच्या भोलाने चौथ्या दिवशी वेग पकडला, पहिल्या वीकेंडमध्ये उत्तम कमाई - माऊथ पब्लिसिटीचा भोलाला फायदा

अजय देवगण दिग्दर्शित भोला हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. त्याने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट उत्तरेत चांगली कामगिरी करत आहे.

अजय देवगणच्या भोलाने चौथ्या दिवशी वेग पकडला

author img

By

Published : Apr 3, 2023, 12:56 PM IST

मुंबई - अजय देवगणचा अ‍ॅक्शन थ्रिलर भोला हा त्याचा चौथा दिग्दर्शन असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 30 मार्च रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर जवळपास 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या बॉक्स ऑपिसवर मोठी स्पर्धा असून साऊथ स्टार नानीचा दसरा या चित्रपटाशी भोलाची तगडी फाईट असताना उत्तम कामगिरी केली आहे.

भोलाने रविवारी गियर बदलला - पहिल्या रविवारी, भोलाने उत्तम कामगिरी केली आणि एकूण कमाई 40 कोटी रुपयांच्या वर पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांचे वीकेंड कलेक्शन रु. 44.70 कोटी झाले आहे. चित्रपट उत्तर भारत पट्ट्यात चांगली कामगिरी करत आहे तर दसरा हा नानीचा चित्रपट हॅन इंडिया रिलीज झाला असला तरी, त्याच्या मूळ कर्नाटकात कमी कामगिरी करत आहे. दसरा हा नानीचा चित्रपट त्यातील दमदार अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून केजीएफ प्रमाणेच आक्रमक आहे.

समीक्षकांचे कौतुक आणि माऊथ पब्लिसिटीचा भोलाला फायदा - समिक्षकांनी केलेले कौतुक, प्रेक्षकांनी केलेली माऊथ पब्लिसिटी आणि अजयच्या स्टार अपीलचा भोलाला फायदा झाला आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले होते, हे पाहता अजयने चित्रपटातील अ‍ॅक्शन सीक्वेन्स प्रेक्षकांसाठी आकर्षक पद्धतीने साकारले आहेत. सोमवारी चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी कमी होण्याचा अंदाज आहे, तथापि, मंगळवारी त्यात काही सुधारणा दिसू शकते, कारण महावीर जयंतीनिमित्त अनेकांसाठी आंशिक सुट्टी आहे.

नानीच्या दसरा चित्रपटाचीही उत्तम कामगिरी - किंबहुना, सोमवार संध्याकाळपासून संकलनात थोडीशी वाढही होऊ शकते. भोलावर त्याचा कसा परिणाम होतो आणि पहिल्या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट १०० कोटींच्या आसपास पोहोचू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान, गुरुवारी देखील पडद्यावर आलेल्या दसरा चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे. त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडला, नानी-अभिनीत चित्रपटाने 58.05 कोटी रुपयांची कमाई केली.

हेही वाचा - Love Of My Life: अल्लू अर्जुनने मुलगा अयानसाठी शेअर केली वाढदिवसाची सुंदर पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.