ETV Bharat / entertainment

Bharat Jadhav new Drama Astitva : भरत जाधवचं 'अस्तित्व' नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला ; कधी होणार प्रयोग जाणून घ्या... - भरत जाधव

भरत जाधवचं आगामी नाटक 'अस्तित्व' लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकामध्ये त्याची भूमिका ही खूप वेगळी असणार आहे. सध्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Bharat Jadhav new Drama Astitva
भरत जाधव नवीन नाट्य अस्तित्व
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 2:18 PM IST

Updated : Oct 24, 2023, 5:03 PM IST

मुंबई - Bharat Jadhav new Drama Astitva : अभिनेता, निर्माता भरत जाधवचं नवीन नाटक 'अस्तित्व' सध्या चर्चेत आहे. या नाटकात भरत जाधव हा वेगळ्या भूमिकेत असणार आहे. भरतने आजवर वेगवेगळ्या जातकुळीच्या नाटकांमध्ये काम केलं आहे. नाट्यरसिकांच्या लाडक्या भरतचं नवंकोरं कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' येत्या 3 नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग सादर करणार आहे. या नाटकामध्ये चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. भरत जाधवनं बऱ्याच विनोदी भूमिका आणि नकारात्मक भूमिकाही रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत.

भरत जाधवचं नवीन नाटक : भरत जाधवच्या नाटकाला आणि चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यानेदेखील रसिकांचं खूप मनोरंजन केलं आहे. आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचा विषय कौटुंबिक असणार आहे. या नाटकात एक कुटुंब आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे. ही कहाणी कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून निवृत्त होण्याच्या मार्गावर असलेल्या संतोष हसोळकर या गृहस्थाच्या कुटुंबाची आहे. या गृहस्थानं निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येकजण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आता या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला नाट्यकृतीतूनच कळेल.

'अस्तित्व' नाटकाबद्दल... : या नाटकाच्या निमित्तानं सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार देखील रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. या नाटकाला साई पियुष यांनी संगीत दिले असून सरीता भरत जाधव यांनी या नाटकाच्या निर्मिती केली आहे. नाटकाबाबत दिग्दर्शक स्वप्नील जाधव म्हणतात, 'सर्वसामान्यांना भावणारी आणि मनाला स्पर्श करणारी ही कहाणी आहे. आपण नेहमीच अनेकांकडून कळत नकळत अपेक्षा ठेवत असतो. या अपेक्षांसोबत मेळ साधताना कुठेतरी आपण आपले अस्तित्व हरवून बसत असतो. अशावेळी हे नाटक प्रत्येकाला नक्कीच सकारात्मक मार्ग दाखवणारे ठरणार आहे. या अपेक्षांच्या गर्तेत गुरफटलेल्या अस्तित्वाचा शोध घेणारे हे नाटक, नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना विचार करण्यास नक्कीच भाग पाडेल. आपल्याच घरात किंवा आपल्या आजूबाजूला घडणारी ही कहाणी आहे, त्यामुळे रसिक या नाटकाशी समरूप होतील. एवढं नक्की की हे भावनिक नाटक कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल.

वेगवेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखांमधून आपल्या अभिनयगुणांनी नाट्यरसिकांची मनं जिंकणाऱ्या भरतला विनोदी अभिनेता म्हणून जास्त ओळख मिळाली. आता करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर भरत आपण गंभीर भूमिकांकडे परत आल्याचं आपल्या चाहत्यांना पटवून देण्यासाठी उत्सुक आहे. व्यावसायिक रंगभूमीवरच्या आपल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत पुन्हा एकदा आपलं स्वतंत्र 'अस्तित्व' दाखवण्यात भरत यशस्वी होईल, याची त्याच्या चाहत्यांना पूर्ण खात्री आहे.

हेही वाचा :

1. Bharat Jadhav new play : भरत येतोय परत, याखेपेस हळव्या भूमिकेतून दाखवणार 'अस्तित्व'

2. Happy Birthday Prabhas : क्रिती सेनॉन वाढदिवसानिमित्त दिल्या प्रभासला शुभेच्छा; केली खास पोस्ट शेअर...

3. Raj Kundra on UT69 : चित्रपट बनवायचा विचार नव्हता : राज कुंद्रानं केला 'UT69' च्या निर्मितीचा खुलासा

Last Updated : Oct 24, 2023, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.