मुंबई : बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपटांमध्ये लढत आहे. ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट 'ओपेनहायमर' आणि ग्रेटा गेरविगचा चित्रपट 'बार्बी' बॉक्स ऑफिसवर आधीच राज्य करत आहेत, पण आता भारतात या दोन्ही चित्रपटांना स्पर्धा देण्यासाठी करण जोहरचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटगृहात दाखल झाला आहे. २१ जुलै रोजी रिलीज झालेला 'ओपेनहायमर' भारतातील १०० कोटी क्लबच्या अगदी जवळ पोहोचला आहे, तर 'बार्बी' चित्रपटाने देखील जगभरात यशाचे डोंगर गाठले आहे. बॉक्स ऑफिसवर सर्व चित्रपटांचा वीकेंड कसा गेला, संपूर्ण रिपोर्ट येथे वाचा.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ओपेनहायमर' चित्रपटाची कमाई : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट जगभरात कमाईच्या बाबतीत 'बार्बी'पेक्षा मागे पडला असेल, पण भारतात हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. 'ओपेनहायमर'ने रविवारी एका दिवसात हिंदीत ७३ लाखांचा व्यवसाय केला, तर इंग्रजीमध्ये या चित्रपटाने एका दिवसात ६.५६ कोटींची कमाई केली. हिंदी भाषेतील चित्रपटाचे एकूण कलेक्शन आतापर्यंत १०.५३ कोटींवर पोहोचले असून इंग्रजीमध्ये चित्रपटाने एकूण ८१ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन आतापर्यंत ९२.०९ कोटी इतके झाले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'बार्बी' चित्रपटाची जगभरातील कमाई : जगभरात 'ओपेनहायमर' चित्रपटाने १० दिवसांत २५५० कोटींचा व्यवसाय केला. दरम्यान 'बार्बी' चित्रपटाने जगभरात चांगली कमाई करत आहे. ग्रेटा गेरविगच्या 'बार्बी' या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देत आहे. २१ जुलै रोजी या चित्रपटाची शानदार ओपनिंग झाली. मार्गोट रॉबी आणि रायन गोस्लिन स्टारर या चित्रपटाची कमाई भारतात खूपच कमी आहे, परंतु हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर विजयचे झेंडे रोवत आहे. भारतात इंग्रजी भाषेत रिलीज झालेल्या या चित्रपटाने रविवारी १०व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एका दिवसात ३.२५ कोटींचा व्यवसाय केला. 'बार्बी' चित्रपटाने आतापर्यंत इंग्रजी भाषेत ३५.३५ कोटींचा व्यवसाय केला आहे, तर जगभरातील चित्रपटाने ५२५० कोटींची कमाई करून एक इतिहास रचला आहे.
हेही वाचा :