मुंबई - बाईपण भारी देवा या चित्रपटाने पुन्हा एकदा कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रिलीजीच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाने प्रेक्षकांना चकित केले होते. या चित्रपटाला मिळालेली अफाट माऊथ पब्लिसिटी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवून देत आहे. सैराट, नटसम्राट आणि अलिकडे रिलीज झालेल्या वेड चित्रपटानंतर पहिल्यांदाच इतकी अफाट लोकप्रियता या चित्रपटाला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्याच्या अखेरही महाराष्ट्रीतील अनेेक शहरात चित्रपटाचे खेळ हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय.
चित्रपट व्यापार विषयक विश्लेषक तरण आदर्श यांनी बाईपण भारी देवा चित्रपटाने रचलेल्या इतिहासाची नोंद घेत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिलंय, 'बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत ९८ टक्केची वाढ झाली आहे. हा चित्रपट म्हणजे न थांबवता येणारी शक्ती आहे. दुसऱ्या आठवड्याच शुक्रवारी चित्रपटान २.३१ कोटी कमावले. शनिवारी २.७९ कोटी, रविवारी ६.१० कोटी, सोमवारी २.७९ कोटी, मंगळवारी २.८७ कोटी, बुधवारी २.७९ कोटी. अशा प्रकारे चित्रपटाने एकूण ३७. ३५ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.'
बाईपण भारी देवाच्या कमाईवर एक नजर.
- पहिला आठवडा १२.५० कोटी
- दुसरा आठवडा २४.८५ कोटी
एकूण कमाई ३७.२५ कोटी.
पहिल्या आठवड्याच्या कमाईत सुमारे दुप्पट वाढ दुसऱ्या आठवड्यात करण्याचा विक्रम चित्रपटाने प्रस्थापित केला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरू असलेली वाटचाल आश्चर्य चकित करणारी आहे. सहा बहिणींची ही सुंदर कथा प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. एखाद्या सणाला नटून थटून जातात त्याप्रमाणे महिला मोठ्या संख्येने चित्रपट गृहाकडे येतात. विशेष म्हणजे या चित्रपटातील गाण्यावर थिएटर बाहेर मंगळागौर खेळतानाही काही ठिकाणी महिला आढळल्या आहेत. या चित्रपटातील गाणी ही पारंपरिक असल्यामुळे त्याचा ठेका आणि चाली महिलांच्या परिचयाच्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी येणारा महिला प्रेक्षक सर्व वयोगटाचा असून यातील कथेतील पात्रांशी त्या रिलेट करताना दिसतात.
-
CREATES HISTORY… RECORDS 98.8% JUMP IN WEEK 2… #Marathi film #BaipanBhariDeva is an UNSTOPPABLE FORCE… [Week 2] Fri 2.31 cr, Sat 5.28 cr, Sun 6.10 cr, Mon 2.79 cr, Tue 2.88 cr, Wed 2.70 cr, Thu 2.79 cr. Total: ₹ 37.35 cr 🔥🔥🔥. Nett BOC. #Boxoffice#BaipanBhariDeva biz at a… pic.twitter.com/DpwCMgOA2J
— taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CREATES HISTORY… RECORDS 98.8% JUMP IN WEEK 2… #Marathi film #BaipanBhariDeva is an UNSTOPPABLE FORCE… [Week 2] Fri 2.31 cr, Sat 5.28 cr, Sun 6.10 cr, Mon 2.79 cr, Tue 2.88 cr, Wed 2.70 cr, Thu 2.79 cr. Total: ₹ 37.35 cr 🔥🔥🔥. Nett BOC. #Boxoffice#BaipanBhariDeva biz at a… pic.twitter.com/DpwCMgOA2J
— taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2023CREATES HISTORY… RECORDS 98.8% JUMP IN WEEK 2… #Marathi film #BaipanBhariDeva is an UNSTOPPABLE FORCE… [Week 2] Fri 2.31 cr, Sat 5.28 cr, Sun 6.10 cr, Mon 2.79 cr, Tue 2.88 cr, Wed 2.70 cr, Thu 2.79 cr. Total: ₹ 37.35 cr 🔥🔥🔥. Nett BOC. #Boxoffice#BaipanBhariDeva biz at a… pic.twitter.com/DpwCMgOA2J
— taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2023
हेही वाचा -