ETV Bharat / entertainment

केएल राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथिया शेट्टीची मिश्कील प्रतिक्रिया - केएल राहुल आणि अथिया शेट्टी

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करण्याच्या अफवांवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी अटकळ पसरली होती की अभिनेत्री वर्षाच्या अखेरीस तिच्या दीर्घकाळाच्या प्रियकरासोबत लग्न करण्याचा विचार करत आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी
केएल राहुल आणि अथिया शेट्टी
author img

By

Published : Jul 13, 2022, 4:52 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या अफवेवर अखेर मौन सोडले आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असलेल्या अथियाने येत्या काही महिन्यांत हे जोडपे लग्न करणार असल्याच्या अफवांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

गेल्या काही दिवसांपासून, अशी अटकळ बांधली जात होती की अभिनेत्री अथिया शेट्टी तिचा दीर्घकाळचा प्रियकर, क्रिकेटर केएल राहुलसोबत पुढील तीन महिन्यांत लग्न करण्याची योजना आखत आहे. आता तिने ही चर्चा फेटाळून लावली आहे. बुधवारी, तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले: "मला आशा आहे की 3 महिन्यांत होणाऱ्या या लग्नासाठी मला आमंत्रित केले जाईल." अशी मिश्कील प्रतिक्रिया तिने दिली आहे.

या जोडप्याने मुंबईत एक नवीन आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाण्याची योजना आखत आहेत अशी अफवा पसरली होती. ही अफवाही यापूर्वी खोडून काढली होती.

राहुल आणि अथिया या लव्हबर्ड्सबद्दल बोलायचे तर या जोडप्याने मागील वर्षी त्यांचे नाते अधिकृत केले होते. राहुलने अथियाचा भाऊ अहान शेट्टीचा पहिला चित्रपट 'तडप'च्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. हे जोडपे नुकतेच म्युनिक, जर्मनीला गेले होते जिथे राहुलवर शस्त्रक्रिया झाली होती.

दरम्यान, सुनील शेट्टीची मुलगी अथियाने अलीकडेच यूट्यूबवर पदार्पण केले आहे. अलिकडेच ती नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मोतीचूर चकनाचूरमध्ये शेवटचे दिसली होती. तिने 2015 साली सलमान खानच्या सूरज पांचोली सोबत 'हिरो' या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला होता.

हेही वाचा - ट्रेकिंग करताना शहनाज गिल पोहोचली भाताच्या शेतात, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.