मुंबई : निर्माते दिग्दर्शक चित्रपटांतून नवनवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीस आणत असतात. प्रेक्षकांनाही नवीन जोड्या बघायला आवडतात आणि जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. 'तराफा'च्या पहिल्या पोस्टरनं या चित्रपटाबाबतचं कुतूहल वाढवण्याचं काम केलं आहे. पोस्टरवर दिसलेले कलाकार नेमके कोण आहेत आणि यात नेमकी कोणत्या कलाकारांची जोडी असेल याबाबत बरेच कयास लावले गेले.
तराफाची टीम
अश्विनी आणि पंकज या जोडीसोबत या चित्रपटात दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबतच सुबोध पवार यांनी 'तराफा'ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन करत चतुरस्त्र कामगिरी बजावली आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून 'तराफा'ची कहाणी पहायला मिळेल. सुबोध आणि अमृता यांनी लिहिलेल्या गीतांना विजय गटलेवार, जयश्री करंबेळकर, विवेक नाईक यांनी स्वरसाज चढवला आहे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. तर प्रदीप कार्लेकर आणि शार्दुल कुंवर यांनी कोरिओग्राफी केली आहे. शाऊल गटलेवार यांनी वेशभूषा, तर संतोष भोसले यांनी रंगभूषा केली आहे. केशभूषा मनाली भोसले यांची असून, कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केलं आहे. सुधीर मेश्राम या चित्रपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असून, महेश जी. भारंबे कार्यकारी निर्माते आहेत.
हेही वाचा - शाहरुखने केली राजकुमार हिरानीसोबत चित्रपटाची घोषणा, पाहा व्हिडिओ