ETV Bharat / entertainment

Asha Bhosle Birthday : चिरतरुण आवाजाच्या सदाबहार गायिका आशा भोसलेंचा वाढदिवस; गाण्यांच्या जादूनं जिंकलं जग... - आशा भोसलेंचा आज वाढदिवस

Asha Bhosle Birthday : मराठी-हिंदीसह जगातील बहुतांश भाषांमधील गाणी लीलया गाणाऱ्या आशा भोसले यांचं नाव संगीतविश्वात मोठ्या आदरानं घेतलं जातं. या झगमगत्या जगात त्यांनी सात दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट आणि अगणित काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. आशा भोसले यांनी कित्येक भाषांमध्ये प्रत्येक शैलीत गाणी गाऊन जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान मिळवलं आहे.

Asha Bhosle birthday
आशा भोसले वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 8:13 AM IST

Updated : Sep 8, 2023, 5:35 PM IST

मुंबई : Asha Bhosle Birthday : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं नाव जगातील एक अव्वल कलाकार म्हणून घेतलं जातं. ८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले आज त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मंगेशकर कुटुंबात झाला. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं त्या तिसरं आपत्य. मास्टर दीनानाथ हे देखील प्रसिद्ध (Asha Bhosle Iconic Songs) गायक होते.

लहानपणापासूनच गाण्याची आवड - दीनानाथ मंगेशकर यांनीच लहान वयातच आशा यांना शास्त्रीय संगीत शिकवलं. आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी संगीताच्या दुनियेत पाऊल ठेवलं. १९४३ मध्ये त्यांनी पहिलं मराठी गाणं गायलं होतं. 'चला चला नव बाळा' हे पहिलं मराठी गाणं आशा ताईंनी गायलं. तर, १९४८ मध्ये आलेल्या 'चुनरिया' चित्रपटासाठी 'सावन आया' हे पहिलं हिंदी गाणं त्यांनी गायलं होतं.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित - संगीत जगतामध्ये आशाताईंची प्रचंड अशी कामगिरी आहे. नोंद झालेल्या ज्ञात माहितीचा विचार करता आजपर्यंत त्यांनी २० भाषांमध्ये १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. यामुळं सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं. त्यांना तब्बल दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कारानं (Dadasaheb Phalke Award) गौरवण्यात आलं. तसंच सातवेळा फिल्म फेयर पुरस्कार आशाताईंना मिळाला. देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी दोन नंबरच्या पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा ग्रॅमी पुरस्कारासाठीही त्यांचं नामांकन झालं होतं.

गायली हजारो गाणी - आशाताईंनी उभं आयुष्य गान कारकिर्दीत व्यतित केलं, आजही त्या उत्स्फुर्तपणे गातात. त्यांच्या जादूई आवाजानं एकापेक्षा एक गाणी सुपरहिट केली आहेत. आशा भोसले यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत १६ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज दिलाय. आज आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या काही सुपरहिट गाण्यांबद्दल सांगणार आहोत....

  • कजरा मोहब्बत वाला - 1968 मध्ये रिलीज झालेल्या 'किस्मत' चित्रपटातील हे गाणं इतकं सुपरहिट ठरलं की त्याचा रिमेक अनेकवेळा बनवण्यात आला. आशा भोसले आणि शमशाद बेगम यांच्या आवाजात अत्यंत सुरेख असं हे गाणं आहे.
  • झुमका गिरा रे - हे गाणं 1966 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरा साया' चित्रपटातील आहे. आशा भोसले यांच्या जादूई आवाजानं या गाण्याचंच सोनं केलं. हे गाणं त्यावेळी सुपरहिट ठरलं होतं. आजही हे गाणं खूप आवडीनं चाहते ऐकतात.
  • पिया तू अब तो आजा - 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कारवां' चित्रपटातील हे गाणं अभिनेत्री हेलनवर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्यासाठी आशा भोसले यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कारही मिळाला होता. हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे.
  • एक परदेसी मेरा दिल ले गया - 1958 मध्ये रिलीज झालेल्या 'फागून' चित्रपटातील हे गाणं खूप सुपरहिट झालं होतं. अनेकांनी या गाण्याचा रिमेक बनला आहे. हे गाणं मोहम्मद रफी यांनी आशा भोसले यांच्यासोबत गायलं होतं.
  • राधाला कैसे ना जले - 2000 साली रिलीज झालेल्या आमिर खान स्टारर सुपरहिट चित्रपट 'लगान'मधील हे गाणं आशा भोसले यांनी उदित नारायणसोबत गायलं होतं. हे गाणं आजही ऐकले जाते.
  • किताबें बहुत सी पढ़ी होंगी - 1993 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर 'बाजीगर' चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजानं 'किताबों बहुत सी पढी होगी' हे गाणं गायिलं होतं.

हिंदी गाण्यांच्या बरोबर आशाताईंनी शेकडो मराठी अजरामर गाणी गायली आहेत. त्यातील काही गाण्यांच्यामध्ये मलमली तारुण्य माझे..., तुझ्या गळा माझ्या गळा..., तरुण आहे रात्र अजूनी.., एका तळ्यात होती.... या आणि अशा असंख्य गाण्यांचा उल्लेख करावा लागेल.

आशा भोसले यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे कोणत्याही एकाच प्रकारच्या गायकीमध्ये त्या कधीच अडकून पडल्या नाहीत. त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या प्रकारांमध्ये एवढं वैविध्य दिसून येतं की एकाच गायिकेनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवाज, लय, भाषेची विविधता कशी साधली असेल असा प्रश्न पडतो. हीच त्यांची खासियत अचंबित करणारी आहे.

हेही वाचा -

  1. आशा भोसलेंनी ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गायले उडत्या चालीचे गाणे
  2. Maharashtra Bhushan 2023: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान; वाद्यवृंद, पार्श्वगायकांचे मानले आभार

Last Updated : Sep 8, 2023, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.