ETV Bharat / entertainment

Arjun Rampal : अर्जुन रामपाल ५० व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाबा ; गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म... - अर्जुन रामपाल चौथ्यांदा वडील

बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला हे दोघे आई-बाबा झाले आहेत. अर्जुनने ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे.

Arjun Rampal
अर्जुन रामपाल
author img

By

Published : Jul 21, 2023, 10:48 AM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने चार वर्षांपूर्वी अरिक नावाच्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर गॅब्रिएलाने एप्रिल २०२३ मध्ये सोशल मीडियावर तिच्या दुसऱ्यांदा आई होणार असल्याची घोषणा केली. दरम्यान आता ग्रॅबिएला दुसऱ्यांदा आई झाली आहे. तसेच अर्जुन हा पुन्हा एकदा पिता झाला आहे. यावेळी अर्जुन खूप आनंदी आहे. त्यामुळे आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने ट्विटरवर लिहिले, 'माझ्या कुटुंबाला आणि मला आज एका सुंदर मुलाचे सौभाग्य प्राप्त झाले, आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.' असे त्याने सांगितले. अर्जुनच्या पोस्टवर अनेक कमेंट सध्या येत आहेत.

अर्जुन आणि गॅब्रिएला चाहते करत आहेत अभिनंदन : अर्जुन रामपालची ही पोस्ट समोर येताच चाहत्यांसह काही स्टार्सनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहेत. बॉबी देओलने कमेंट करत लिहिले, 'अभिनंदन मित्रा.' राहुल देव यांनी लिहिले, 'बाबा आणि आईचे खूप अभिनंदन.' निर्मात्या प्रज्ञा कपूर यांनी लिहिले, 'अभिनंदन, लहान बाळाला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.' याशिवाय एमी जॅक्सन आणि दिव्या दत्ता यांसारख्या स्टार्सही या जोडप्याला शुभेच्छा दिसल्या आहेत.

  • My family and I were blessed with a beautiful baby boy today, Mother and son are both well. Filled with love and gratitude. ❤️ Thank you for all your love. #20.07.2023 #helloworld pic.twitter.com/i4aEZqwLrf

    — arjun rampal (@rampalarjun) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अर्जुन रामपाल चौथ्यांदा वडील झाला आहे : पुर्वी अर्जुन रामपालचे लग्न मेहर जेसियासोबत झाले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. काही काळानंतर दोघे वेगळे झाले. अर्जुनला एक्स पत्नीपासून महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. तर, मेहरपासून घटस्फोट घेतल्यापासून अर्जुन मॉडेल गॅब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मीडिया रिपोर्टनुसार अर्जुन आणि गॅब्रिएला २०१८ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. काही महिन्यांनंतर दोघेही डेट करू लागले. या जोडप्याला २०१९मध्ये पहिला मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी अरिक ठेवले. अर्जुन शेवटी कंगना राणौत सोबत 'धाकड' या चित्रपटात दिसला होता, आता तो अब्बास मस्तानच्या आगामी 'पेंटहाउस' चित्रपटात बॉबी देओलसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'क्रॅक' या स्पोर्ट्स अ‍ॅक्शन चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Trial Period web series : जेनेलिया देशमुखच्या 'ट्रायल पीरियड' वेब सिरीजचे २१ जुलै पासून होणार प्रसारण
  2. Good Vibes Only web film : सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली वेबफिल्म, 'गुड वाईब्स ओन्ली'!
  3. MI 7 box office collection: टॉम क्रूझ स्टारर मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर मंद गतीने करत आहे कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.