मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने 11 वर्षीय अनिशा राऊतला तिच्या स्वप्नाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अनिशाचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अर्जुनने तिच्या 18 वर्षांच्या प्रशिक्षणाचा आणि उपकरणांचा खर्च उचलण्याचे ठरवले आहे. अनिशा राऊत आठ तासांच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी दिवसाला ८० किलोमीटरचा प्रवास करते. तिला तिचा हिरो, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरप्रमाणे व्यावसायिक खेळाडू बनायचे आहे.
मुलीच्या पंखाना बळ मिळावे यासाठी वडिलांचे प्रयत्न - अनिशाचे वडील प्रभात आपल्या मुलीच्या पंखांना जोरदार बळ देण्यासाठी खूप मेहनत घेतात. अनिशाला सर्व उत्तम सुविधा आणि उपकरणे आवश्यक आहेत, जेणेकरून ती भारतासाठी खेळण्यासाठी सर्वोत्तम शॉट देऊ शकेल. अनिशाचे वडील प्रभात सांगतात, पालक या नात्याने आम्हाला आमच्या मुलासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, पण जागतिक स्तरावरील क्रिकेटपटू होण्यासाठीचे प्रशिक्षण महागडे आहे. अनिशाला भारताची कॅप मिळवायची आहे आणि सचिन तेंडुलकरप्रमाणे तिला देशाचा गौरव करायचा आहे.
अर्जुन कपूरचे मानले आभार - वडील म्हणाले: एक वडील म्हणून, मला तिला सक्षम बनवण्याची गरज आहे जेणेकरून तिने जोरदार प्रयत्न केला पाहिजे आणि पुढील पिढ्यांसाठी ती इतरांसाठी प्रेरणा बनू शकेल. अर्जुन कपूरची ही मदत म्हणजे दैवी वरदान आहे. अर्जुन कपूरच्या मदतीने माझ्या खांद्यावरील बरेच ओझे उतरवले गेले आहे. मला त्यांचे आभार मानायचे आहेत. एक क्रिकेटर म्हणून अनिशासाठी सर्वोत्तम उपकरणे मिळणे महत्त्वाचे आहे आणि आता ती १८ वर्षांची होईपर्यंत तिच्याकडे सर्व काही असेल.
प्रतिभावान क्रिकेटर आहे अनिशा राऊत - महाराष्ट्रातील पनवेल येथे राहणारी अनिशा तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसाचे आठ तास ट्रेनींग करते. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपट पाहून तिला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या 10 व्या वर्षी, तिने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यासाठी 15 वर्षांखालील महिला क्रिकेट सामना खेळला. तिने मागील सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. अनिशा सध्या एमआयजी क्लब अंडर-15 कडून खेळत आहे. ती तिच्या संघासाठी फलंदाजी करते.
हेही वाचा - Namrata Shirodkars Three Musketers : नम्रता शिरोडकरने शेअर केला तिच्या सर्वाधिक प्रिय व्यक्तींचा फोटो