मुंबई - Shura Khan 31st birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अरबाज खानसाठी आज 18 जानेवारी हा दिवस खूप विशेष आहे. त्याची पत्नी शूरा खानचा आज 31 वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मानं वहिनी शूरा खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्पितानं तिच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर पोस्ट केला आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं, ''शूरा खान, तुला 31व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्पिता तिच्या वहिनीसोबत दिसत आहे. हा फोटो अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नामधील आहे.
शूरा खानला तिच्या मित्राने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या : शूरा खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिची मैत्रीण राधिका पंडितनं तिचा केक कापतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शूरा तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शूराच्या बेस्टीनं लिहिलं, 'आता मी तुझ्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ वापरत आहे, हॅपी बर्थडे मेरी शुरी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'. हिंदी चित्रपटसृष्टीत शूरा खान ही एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट असून तिनं अनेक बड्या कलाकारांच मेकअप केला आहे. दरम्यान शूरा आणि अरबाज हा अनेकदा बाहेर फिरताना एकत्र दिसतात. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
अरबाज खान आणि शूरा खानचं लग्न : अरबाज खान आणि शूरा खान यांनी मुंबईत अर्पिता खान शर्माच्या निवासस्थानी 24 डिसेंबर 2023 रोजी निकाह कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि खास मित्रांच्या उपस्थित केला. शूरा खाननं या प्रसंगी फुलांचा डिझाईन असलेला लेहेंगा परिधान केला होता, तर अरबाज खाननं देखील फुलांचा डिझाईन असलेला पोशाख घातला होता. यावेळी दोघेही एकत्र सुंदर दिसते होते. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं. या लग्नात अरबाज खानचा मुलगा अरहान खान देखील हजर होता. शूरा ही अरबाजपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे अनेकजणांनी या जोडप्याला त्याच्यामधील असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे ट्रोल देखील केलं होत.
हेही वाचा :