ETV Bharat / entertainment

अरबाज खानच्या लग्नात सलमान खानचा नवविवाहित वधू आणि अरहान खानसोबत डान्स - अरबाज खानच्या लग्नात सलमानचा डान्स व्हिडिओ

Arbaaz Khan and Sshura Khan wedding: सलमानचा भाऊ अरबाज खान आणि मेकअप आर्टिस्ट शशुरा खान यांच्या निकाह सोहळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटोऑनलाइन समोर आले आहेत. त्यापैकी एका व्हायरल क्लिपमध्ये, सलमान खान नवविवाहित वधू आणि अरबाजचा मुलगा अरहान खानसोबत नाचताना दिसत आहे.

Arbaaz Khan and Shashura Khan Marriage
अरबाज खान आणि शशुरा खान विवाह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 12:10 PM IST

मुंबई - Arbaaz Khan and Sshura Khan wedding: अभिनेता-निर्माता अरबाज खान 24 डिसेंबर रोजी मुंबईत मेकअप आर्टिस्ट शशुरा खानसोबत विवाह बंधनात अडकला आहे. अरबाजची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी हा निकाह सोहळा पार पडला. या छोटेखानी विवाह सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यामुळे या कार्यक्रमाकडे लक्ष वेधले गेले. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये सुपरस्टार आणि अरबाजचा मोठा भाऊ सलमान खान आनंदाने नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत डान्स फ्लोअरवर नवविवाहित वधू आणि अरबाजचा मुलगा अरहान खान देखील सामील झाला होता.

मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, सलमान खान त्याच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील 'दिल दियां गल्लन'च्या गाण्यावर नाचताना दिसला. सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री, अरहान आणि पाहुण्यांसह कुटुंबातील इतर सदस्य या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले होते. शुरानेही खान कुटुंबासोबत आनंदाने डान्स केला, तर अरबाज व्हिडिओमध्ये हजर नव्हता. याशिवाय, दुसर्‍या क्लिपमध्ये सलमान दबंग चित्रपटातील तेरे मस्त मस्त दो नैनवर नाचत असल्याचे दिसत आहे.

अरबाज खानने सोशल मीडियावर लग्नाचा पहिला अधिकृत फोटो शेअर केला. या जोडप्याने या खास प्रसंगासाठी सुंदर कपडे घातलेले दिसत आहे. अरबाजने निकाह समारंभासाठी पीच-रंगीत फुलांच्या लेहेंगाच्या शुराच्या पोशाखाला मॅचिंग असलेल्या बेज ट्राउझर्ससह फुलांचा ड्रेस घातला होता. आनंद व्यक्त करताना अरबाजने हितचिंतकांचे आणि लग्नाबद्दल शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले.

लग्नाच्या विधींना रविवारी दुपारी सुरुवात झाली. यावेळी पापाराझींनी अर्पिताच्या निवासस्थानाबाहेर आलेल्या पाहुण्यांची झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. अरबाज आणि शुरा स्वतंत्रपणे विवाहस्थळी आले, तर अरबाजचे पालक, सलीम खान आणि सलमा खान देखील कार्यक्रमस्थळी स्पॉट झाले.

रवीना टंडन, रिद्धिमा पंडित, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांसारख्या सेलिब्रिटींनी निकाह समारंभात सहभाग घेतला. रवीनाने सोशल मीडियावर या जोडप्याचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे, अरबाजने यापूर्वी मलायका अरोरासोबत लग्न केले होते. तिच्यासोबत त्याला अरहान नावाचा मुलगा आहे. गेल्या वर्षी जॉर्जिया अँड्रियानीसोबतचे त्याचे नाते संपुष्टात आले होते.

हेही वाचा -

  1. प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार'चा पहिल्या तीन दिवसात 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश
  2. 'सालार' वादळापुढे 'डंकी'ची चिवट झुंज, पहिल्या विकेंडची कमाई 100 कोटी पार
  3. विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल' ओटीटीवर होणार रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.