हैदराबाद: Aparna Nair found dead at home मल्याळम मनोरंजन विश्वातून एक खळबळजनक बातमी आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर केरळमधील तिरुवनंतपुरम शहरातील घरी मृतअवस्थेत आढळली. गुरुवारी संध्याकीळी ७ वाजता तिचा मृतदेह सापडला आहे. तिच्या निधनाने मल्याळम टीव्ही आणि सिनेक्षेत्रावर दुःखाचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री अपर्णा नायरचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. यावेळी तिच्या घरी तिची आई आणि बहिण दोघीही हजर होत्या. पोलिसांना हा मृत्यू अनैसर्गिक वाटत असून तशी नोंद त्यानी केली आहे. तिरुअनंतपूरमधील करमणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून अभिनेत्री अपर्णा नायरच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू झाला आहे. करमणा पोलिसांनी अपर्णाचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांचे जबाब नोंदवले आहेत. अपर्णाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व पातळीवर तपास करत आहेत. नातेवाईकांशिवया अपर्णाचे मित्र, फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी व इतरांचीही चौकशी यामद्ये केली जाईल. अभिनेत्री अपर्णाच्या पाठीमागे तिचा पती संजीतसह थ्राया आणि कृतिका असा छोटा परिवार आहे.
अपर्णा नायरने २००५ मध्ये आलेल्या मायोखम चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने अनेक मल्याळम चित्रपट आणि टीव्ही मालिका आणि शोमध्ये काम केले. अभिनेत्री अपर्णा नायर रन बेबी रन, सेकंड्स, आचायंस, मेघतीर्थम, मुद्दुगौ, कार्ट समक्षम बालन वकील, कल्की यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. याशिवाय चंदनमाझा आणि आत्मसाखी या लोकप्रिय मालिकातूनही तिने अभिनय साकारला होता.
(आत्महत्या करणे हा कधीच उपाय असू शकत नाही. जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज वाटत असेल, तर तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी कोणीतरी नेहमी तत्पर आहे. स्नेहा फाऊंडेशनशी 04424640050 या फोम क्रमांकावर संपर्क साधा (24x7 रात्रंदिवस उपलब्ध) किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेच्या हेल्पलाइन क्रमांक - 9152987821 वर कॉल करा. ही सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध असेल.)
हेही वाचा -
२. An end to Seema Haider speculations : बिग बॉस आणि कपिल शर्मामध्ये जाणार नसल्याचा सीमा हैदराचा खुलासा