ETV Bharat / entertainment

अनुराग ठाकूर यांनी 54व्या इफ्फी महोत्सवात माधुरी दीक्षितला विशेष पुरस्कार केला जाहीर

IFFI 2023 : माधुरी दीक्षितला एका विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. याबद्दलची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

IFFI 2023
इफ्फी 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 8:05 PM IST

मुंबई - IFFI 2023: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितनं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. माधुरी दीक्षितनं अनेक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी 'मोहिनी' तर कधी चंद्रमुखीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. माधुरीनं प्रत्येक वेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयानं तिच्या प्रत्येक पात्रात जीव आणला आहे. माधुरी दीक्षित एक उत्तम अभिनेत्रीशिवाय अप्रतिम नृत्यांगना देखील आहे. आता धक धक गर्ल चर्चेत आली आहे. माधुरीला एका विशेष पुरस्कारानं सन्मानित देण्यात येणार आहे

  • A warm welcome to the Film Bazaar at the 54th International Film Festival of India! It's an honour to be here with you, celebrating the art of storytelling in the spirit of collaboration.

    In its 17th year, the Film Bazaar has become an indispensable cornerstone of the IFFI,… pic.twitter.com/5ROQGhVBIB

    — Anurag Thakur (@ianuragthakur) November 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माधुरी दीक्षितला या विशेष पुरस्कारानं सन्मानित केले : '54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये माधुरी दीक्षितला विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली आहे की, ते माधुरीचा विशेष गौरव करणार आहे. 'माधुरी दीक्षितनं 4 दशकांपासून तिच्या प्रतिभेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. माधुरीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. माधुरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपले सुंदर सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

धक धक गर्लचा सिनेमॅटिक प्रवास अनुराग ठाकूर यांनी सांगितला : अनुराग ठाकूर यांनी लिहलं की, 'माधुरी दीक्षितनं 4 दशकांपासून त्याच्या प्रतिभेनं पडद्यावर शोभा वाढवली आहे. 'निशा' पासून ते मनमोहक 'चंद्रमुखी' पर्यंत, 'बेगम पारा' पासून अदम्य 'रज्जो' पर्यंत, तिच्या अष्टपैलुत्वाला मर्यादा नाही. त्यांनी पुढे लिहलं, 'आज आम्हाला 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिभावान आणि करिष्माई अभिनेत्रीला 'भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान' पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे.' अनुराग ठाकूर यांच्या पोस्टला अनेकजण लाईक करत कमेंट करत 'माधुरी दीक्षितचे अभिनंदन करत आहे. आजपासून गोव्यात इफ्फीला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.

हेही वाचा :

  1. थलपथी विजयच्या ब्लॉकबस्टर 'लिओ'ची ओटीटी प्रसारणाची तारीख ठरली
  2. 'या' तारखेला रिलीज होणार रणबीर कपूर आणि रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर
  3. नील भट्टनं केली अंकिता लोखंडेच्या पतीची पोलखोल; जाणून घ्या विकी जैनचं रहस्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.