ETV Bharat / entertainment

Sunny Leone cast for Kennedy : केनेडीसाठी सनी लिओनला का निवडले, याचा अनुराग कश्यपने केला खुलासा - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपने एका मुलाखतीत आपल्या 'केनेडी' या चित्रपटात सनी लिओनला भूमिका देण्याचे कारण सांगितले. बुधवारी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला.

Sunny Leone cast for Kennedy
केनेडीसाठी सनी लिओनला का निवडले
author img

By

Published : May 26, 2023, 6:41 PM IST

मुंबई - अनुराग कश्यपने अभिनेत्री सनी लिओनच्या केनेडीमधील भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या पदार्पणाबद्दल भाष्य केले आहे. या चित्रपटाच्या नाईट प्रीमियरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका मुलाखतीत अनुरागने या चित्रपटातील चार्लीच्या भूमिकेसाठी सनी लिओनची निवड का केली हे सांगितले. केनेडीमधील सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल फारसे काही समोर आलेले नाही आणि टीझरमध्येही तिची फक्त एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर ती हशा पिकवताना टिझरमध्ये दिसत आहे. हा चित्रपट एका निद्रानाश झालेल्या माजी पोलिसावर केंद्रित आहे, जो मृत असल्याचे गृहीत धरले जाते परंतु तो यातून सुटका शोधत आहे.

सनी लिओनची केनेडीसाठी का झाली निवड ? - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, 'मी शपथेवर सांगतो की मी सनी लिओनचे चित्रपट कधीच पाहिलेले नाहीत. तिने घेतलेल्या मुलाखती मी पाहिल्या आहेत. तिच्या डोळ्यात एक निश्चित दुःख आहे. तिचे एक पूर्वायुष्य आहे. मला एका चाळीसीतील अशा महिला कलाकाराचा शोध होता की तिच्या आजूबाजूला असणाऱ्या ५० - ६० वयाच्या पुरुषांकडून तिचे लैंगिक शोषण केले आहे. मला असा प्रकारच्या लैंगिक क्रिया किंवा असे काहीही पाहण्याची गरज नाही. मला अशा महिलेची गरज होती की ती महिला अशा लोकांशी कशी व्यवहार करते, हाताळते आणि नेव्हिगेट करण्यासाठी सर्वकाही करते. मला सनीमध्ये ती एक स्त्री सापडली जिच्याकडे हे सर्व गुण आधीच आहेत.'

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कान्स फेस्टीव्हलमध्ये केनेडीला सात मिनीटांचे स्टँडिंग ओव्हेशन - दरम्यान, केनेडी या चित्रपटात राहुल भटचीही प्रमुख भूमिका आहे. सध्या सुरू असलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि कार्यक्रमात मध्यरात्री स्क्रिनिंग दरम्यान तो प्रदर्शित करण्यात आला, त्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात त्याला 7 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. अनुराग कश्यपने चित्रपटातील स्टार्स सनी लिओन आणि राहुल भटसोबत रेड कार्पेटवर वॉक केला.

हेही वाचा - Cannes 2023 : कान्समध्ये पैसे घेऊन चित्रपट दाखवले जातात, नवाजुद्दीचे धक्कादायक वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.